सातारा : चिंचणी, ता. सातारा येथील सत्यजित बेबले यांची कर्नलपदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्त सरपंच जितेंद्र सावंत, नामदेवराव सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी सत्यजित यांच्या आई शारदा बेबले, वडील सूर्यकांत बेबले उपस्थित होते. अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन बेबले यांनी हे यश संपादन केले आहे.
शुभांगी बोबडे प्रथम
सातारा : हातकणंगले येथील शिक्षक मंचने आयोजिलेल्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत शुभांगी बोबडे यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून २१८ स्पर्धक सहभागी झाले होते. शुभांगी बोबडे या फलटण तालुक्यातील शिपकुलेवस्ती येथे प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.
बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक
सातारा : सातारा तालुक्यात विविध ठिकाणी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘बीजप्रक्रिया’ या विषयावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात येत आले. जैविक व रासायनिक या प्रकारांचा अवलंब कसा करायचे याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शंकर निकम यांचा सत्कार
सातारा : मिलिटरी अपशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रगतीशील शेतकरी शंकर निकम यांचा रब्बी ज्वारी पीक स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय निकम, मंडल कृषी अधिकारी युवराज काटे, सरपंच सारिका गायकवाड, राजश्री कारंडे, राधिका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग १९ मध्ये लसीकरण
सातारा : येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात २२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. विना काकडे, इर्शाद तांबोळी, रसिका पवार, रेश्मा कांबळे, गौरव जाधव, महेश पवार, रोहिणी पवार यांनी सहकार्य केले.
.............