सातारा : जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याकरिता ग्रामविकास विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या राज्य समन्वयक तथा सचिवपदी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय या समितीचे अध्यक्ष हे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आहेत, तर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे तसेच बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे या समितीचे सदस्य असतील.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने ही समिती कामकाज करणार आहे. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी संपूर्ण संगणक प्रणाली तयार करण्यात येणार आहे. संगणकीय प्रक्रियेसाठी लागणाऱ्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करणे तसेच या अंदाजपत्रकाप्रमाणे निधीची मागणी शासनाला करणे, ही कामे ही समिती करणार आहे.
कोट :
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समिती स्थापन झाली आहे. ही समिती याबाबत काम करणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. शिक्षकांसाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
फोटो दि.२६विनय गौडा सीईओ फोटो नावाने मेल...
....................................................................