नितीन काळेल ।सातारा : राज्य शासनाने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला वर्ष होत असून, आतापर्यंत ४४२ कोटी ५५ लाख रुपये जिह्यात मिळाले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या पावणेदोन लाखांहून अधिक सभासद शेतकऱ्यांना ३७३ कोटी ३२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तर आतापर्यंत सर्व बँकांच्या मिळून १ लाख ९६ हजार २२३ शेतकरी कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. २२ सप्टेंबर या अखेरच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १६८४ गावांतील २ लाख ४० हजार ७४७ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. शेतकºयांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यातून पात्र शेतकºयांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येऊ लागली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीतून कर्ज घेणाºया शेतकºयांना ३७३ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. तर राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकाकडील १६ हजार ६४६ शेतकरी कर्जदारांना ६९ कोटी २३ लाख लाभापोटी मिळाले आहेत. दरम्यान, आॅनलाईन अर्ज भरणाºयांची संख्या २ लाख ४० हजार होती. त्यातील १ लाख ९६ हजार २२३ शेतककर्जमाफीयांना पैसे मिळाले आहेत. उर्वरितमधील अनेकजण या योजनेसाठी अपात्र ठरले तर काही नोकरदार राहिले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.प्रोत्साहनपर लाभ टप्पा असा...प्रोत्साहनपर लाभाचे काही टप्पे करण्यात आले होते. त्यामध्ये १५ हजारांपेक्षा कमी कर्ज असणाºयांना कर्जाऐवढी रक्कम तर १५ ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान कर्जधारकांना १५ हजार आणि ६० हजारांपासून एक लाखापर्यंत कर्ज असणाºयांना कर्जाच्या २५ टक्के रक्कम माफीअंतर्गत देण्यात आली. तसेच एक लाखाच्या पुढे कर्ज असणाºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे.शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू होता. त्यावेळी जिल्ह्यातील ३१९ गावांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. कारण, ग्रामपंचायत निवडणूक असणाºया या गावांत कर्जमाफी यादीचे चावडी वाचन होणार नव्हते.आतापर्यंतची कर्जमाफीची रक्कम व संख्या अशी राहिली (जिल्हा व राष्ट्रीयकृत, खासगी बँका)जिल्हा बँक : २७२१० थकबाकीदारांना ११४ कोटी ९३ लाख १५०७६८ कर्जदारांना प्रोत्साहनपर २३६ कोटी ९४ लाख १५९९ कर्जदारांना ओटीएसअंतर्गत १४ कोटी ६० लाखराष्ट्रीय, व्यापारी बँका : ७६८५ थकबाकीदारांना ४६ कोटी ९ लाख ८३९३ कर्जदारांना प्रोत्साहनपर १७ कोटी ४८ लाख ५६८ कर्जदारांना ओटीएसअंतर्गत ५ कोटी ६६ लाख