राजू पिसाळपुसेसावळी: खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुस्त अधिकार्यांमुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अधिकार्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने उपचारासाठी येणार्या रुग्णांची हेळसाड होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.सध्याच्या परिस्थितीत आरोग्य केंद्रामध्ये अत्याआवश्यक रुग्ण अॅडमिट केले जातात. परंतु केंद्रात सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच शोधण्याचे वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे रुग्णांची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुसेसावळीसह परिसरातील पंधरा ते वीस गावांच्या आरोग्यादृष्टीने हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे असून याकडे प्रशासनाने गांभिर्यांने पाहण्याची गरज आहे.
पुसेसावळी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने येथील आरोग्य केंद्रात चोवीस तास वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. त्यामुळे सामान्य रुग्णांची ससेहोलपट होत आहे. - उदय माळवे, ग्रामस्थ