आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:07 PM2024-09-03T12:07:08+5:302024-09-03T12:09:50+5:30

रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत

Are we really in the MahaYuti, Ramraje Naik-Nimbalkar activists asked Ajit Pawar | आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

फलटण : आम्ही पक्षाचे निष्ठने काम करतो, पण कार्यकर्त्यांना ईडी, पोलिस व इतर पद्धतीने धमकावले जात आहे. हे किती दिवस सहन करायचे ?, आपण युती धर्म पाळायचा आणि त्यांनी दबाव टाकायचा. आपण खरेच महायुतीत आहोत का?, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपबिती मांडली. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. गरज पडल्यास थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे फलटण येथे जनसंवाद यात्रा, लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या प्रचारासाठी आले होते. संवाद यात्रेनंतर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजीवराजे नाईक-निंबाळकर यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, महायुतीत एकत्र राहायचे आणि एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे हे सहन केले जाणार नाही. फलटण-कोरेगावात जिल्हा परिषद, तसेच पंचायत समितीत जे वर्चस्व आहे, हे सगळे कार्यकर्त्यांच्या जोरावर. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. युतीतील इतर सहकाऱ्यांशी बोलून तुमचे प्रश्न सोडवू. कुणावरही अन्याय होणार नाही. प्रशासनावर आपली पकड आहे. तुम्ही निश्चित राहा, असे आश्वासन कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि तक्रारी ऐकल्यानंतर अजित पवार यांनी दिले.

रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत

रामराजे यांनी तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असे वक्तव्य केल्यावर महाराष्ट्रातून फोन आले. त्यांना मी सांगितले, रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत आहेत. ते काल जे बोलले ती हुलकावणी होती. पक्षात रामराजे यांना मान आहे. ते निर्णय प्रक्रियेत असतात. त्यामुळे तुम्ही तुतारी वाजवायला किती वेळ लागणार याचा दुसरा अर्थ घेतला आहे.

Web Title: Are we really in the MahaYuti, Ramraje Naik-Nimbalkar activists asked Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.