शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग दर्जा : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 3:34 PM

महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे

ठळक मुद्देभोसरे, नायगावच्या पाठोपाठ लागली वर्णी

सागर गुजर।सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून विख्यात असलेल्या क्षेत्र महाबळेश्वरला शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. खटाव तालुक्यातील भोसरे आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव पाठोपाठ ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेले क्षेत्र महाबळेश्वर हे तिसरे पर्यटनस्थळ ठरले आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १७ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये क्षेत्र महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला ‘ब’ वर्ग पर्यटस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती.

या पर्यटनस्थळाला दरवर्षी अंदाजे १९ ते २० लाख पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाºया पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व विचारात घेता शासनाच्यावतीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. पूर्वी या मंदिरामध्ये गंगा नदीचा प्रवाह होता व त्याच जागेवर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या पाच नद्या उगम पावल्या असून, संपूर्ण भारतात असे एकमेव ठिकाण आहे.क्षेत्र महाबळेश्वरसाठी आता पर्यटन विभागाचा वेगळा निधी मिळणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे सोपे जाणार आहे.जिल्ह्यात एकूण तीन पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. सर्व प्रथम खटाव तालुक्यातील भोसरे या गावाला हा दर्जा मिळाला. भोसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव आहे. गुजर यांनी केलेला पराक्रम आणि त्यांनी दिलेले बलिदान हे इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. भोसरे गावाला ऐतिहासिक महत्त्व असले तरी त्या गावाचा विकास पर्यटनाच्या अंगाने होणे जरुरीचे आहे. या गावाला दरवर्षी पाच लाखांच्या आसपास पर्यटक भेट देत असतात. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने शासनाचा अतिरिक्त निधी मिळाला आहे.मे २०१९ मध्ये नायगावक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाºया नायगावला ऐतिहासिक महत्त्व आहे. २००४ मध्ये शासनातर्फे नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक उभारले  होते. या ठिकाणी आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शासनातर्फे ३ जानेवारी रोजी या ठिकाणी मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने नायगावच्या विकासासाठी आणखी निधी मिळाला आहे. 

ब वर्ग पर्यटनस्थळासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्याला यश आले, महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही गावांना अधिकचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे.- मकरंद पाटील, आमदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार