तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ५३० सदस्य शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. ११३ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये समसमान उमेदवार विजयी झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात पाटण मतदार संघात एकूण ११९ ग्रामपंचायतीपैकी ३६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्येही शिवसेनेने २१ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत गृहराज्यमंत्री देसाईंच्या नेतृत्वाखाली बाजी मारली होती. तर ऊर्वरीत ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या ७१ ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी दौलतनगर येथे मंत्री शंभूराज देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ५३० सदस्यांनी त्यासाठी दौलतनगर येथे तोबा गर्दी केली होती.
फोटो : १९केआरडी०१
कॅप्शन : पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी विजयानंतर दौलतनगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.