शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर-पाटील

By प्रगती पाटील | Published: September 03, 2022 3:55 PM

अर्णिका यांच्या या निवडीने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सातारा : भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी साताऱ्याच्या अर्णिका गुजर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्णिका यांच्या या निवडीने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू ते प्रशिक्षक पदापर्यंतचा अर्णिका यांचा प्रवास आव्हानात्मक आणि दिशादर्शक असा राहिला आहे.बंगळूर येथे ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या महिला आशियाई अजिंक्यपद बास्केटबाॅल स्पर्धेर्साठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर - पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्णिकाच्या निवडीनंतर महाराष्ट्रासह साता-यातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.या स्पर्धेत अ गटात चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, चायनीज तैपेई, इंडोनेशिया आणि भारत हे देश असणार आहेत. तसेच ब विभागामध्ये मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, सामोआ, मालदीव, जॉर्डन, मंगोलिया आणि फिलिपाइन्स हे देश असणार आहेत.

भारतीय संघबीएफआयने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याबाबतचे ट्विट देखील बीएफआयने केले आहे. भारतीय संघात नितिका अमुथन, दीप्ती राजा, सत्या कृष्णमूर्ती, मेखला गौडा, करणवीर कौर, कीर्ती देपली, मनमीत कौर, इरिन एल्सा जॉन पुथेनोराकल, यशनीत कौर, निहारिका रेड्डी मेकापती, भूमिका सिंग, हरिमा सुंदरी मुनीष्कन्नन यांचा समावेश आहे.

संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका पाटील, प्रशिक्षकपदी अनिथा पॉल दुराई, व्यवस्थापकपदी जरीन पीएस तसेच फिजिओथेरपिस्ट म्हणून अहाना पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर