शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

उदयनराजेंना अटक करा

By admin | Published: April 25, 2017 10:45 PM

संदीप मोझर : सर्वसामान्यांना जो न्याय तोच ‘राजा’ला का नाही ?

सातारा : ‘लोकशाहीमध्ये सर्वजण एक समान असतात. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. असे असतानाही खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांतील आरोपाबद्दल अटकपूर्व जामीन फेटाळून सुद्धा गेल्या १५ दिवसांपासून खासदार उदयनराजेंना अटक करण्यात का टाळाटाळ होते? सर्वसामान्यांना जो न्याय तोच राजाला का नाही?, असा प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्या अटकेसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार आहे,’ असे ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून दरमहा सुमारे ६० ते ७० लाखांची खंडणी गोळा करणाऱ्या आणि अकलूजहून साताऱ्यात जगण्यासाठी आलेल्या अशोक सावंतला कोठडी मिळाल्यावरही सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. जर तो खरेच आजारी असेल तर त्याला सिव्हिलमधील आरोपी वॉर्डमध्ये ठेवावे. त्याला असा कोणता आजार झाला आहे की, त्याची खास बडदास्त ठेवली जात आहे. माझ्या मते, सावंतला राजकीय रोग झाला असावा. सदरहू आरोपी कोणता पराक्रम करून आला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याची खातीरदारी केली जात आहे. याचाही खुलासा व्हायला हवा. कारागृहामध्ये कित्येक गोरगरीब आरोपी वैद्यकीय उपचाराअभावी खितपत पडतात आणि सिव्हिलमध्ये जाण्यासाठी अक्षरश: नवसही बोलतात. मग अटक झाल्यापासून अशोक सावंतला हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी व्यवस्थेत का आणि कशासाठी ठेवले जात आहे, याचीही चौकशी व्हावी.लोकशाहीत जनताच राजा असते. कोणी राजा, कोणी प्रजा अशी कोणतीच स्वतंत्र कॅटेगरी नसते. मग लोकसभेचे सदस्यत्व भूषविणाऱ्या उदयनराजेंना कोणाच्या दबावापोटी अटक होत नाही? सर्वसामान्य व्यक्तीकडून किरकोळ गुन्हा घडला. थोडीफार चूक झाली तरी त्याच्यावर तत्काळ कारवाई होते. खंडणी व खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे स्पष्ट होऊनही उदयनराजेंना अटक करण्यात टाळाटाळ होत आहे. सर्वसामान्यांना जो न्याय तोच ‘राजा’ला का नाही? हा प्रश्न जिल्ह्यासहीत महाराष्ट्रातील सामान्य जनतेला पडला आहे.’यावेळी खेडच्या उपसरपंच सुशीला मोझर, मनसे कामगार सेना जिल्हा सचिव सचिन पवार, सागर पवार, प्रगतशील शेतकरी दिलीप सुर्वे, मधुकर जाधव, आसरेचे उपसरपंच अनिल सणस, कुमार जाधव, नितीन सुतार, महिला आघाडीच्या मनीषा चव्हाण, स्वाती माने, अनिता जाधव, भारती गावडे, दीपाली कुंभार उपस्थित होते. (प्रतिनिधी) अटकेच्या भीतीने दूर पळत आहेत... ‘राजकीय प्रवाहातील अनेकांवर यापूर्वी पोलिस व न्यायालयात जाण्याचे प्रसंग आले. मात्र, त्या प्रत्येकाने तपास यंत्रणेला सहकार्य करून आणि न्याय देवतेचा आदर करून भारतीय संविधानाचा मान राखला आहे. मात्र, स्वत:स डॅशिंग म्हणविणारे खासदार मात्र अटकेच्या भीतीने कारवाईपासून दूर पळत आहेत. खंडणी व खुनी हल्ल्यातील त्यांच्या सहभागाचे पुरावे समोर येऊनही स्वत:च्या बचावासाठी ते वेळकाढूपणा करीत आहेत. त्यांनी जे आजपर्यंत पेरले तेच आता उगवत आहे. तरी येत्या आठ दिवसांत उदयनराजेंना अटक न झाल्यास या प्रकरणात व्यापक जनआंदोलन उभारणार आहे,’ असेही संदीप मोझर यांनी स्पष्ट केले आहे.