सातारा : शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात ताडीची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, जुना मोटार स्टँन्ड परिसरात दोन युवक ताडीची अवैध विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या.
भाजी मंडईशेजारी वडाच्या झाडाच्या आडोशाला ताडी विकणाऱ्या प्रकाश अनिल गोरे (रा.मंगळवार पेठ,सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ हजार १०० रुपयांची ६३ लिटर ताडीसह रोख रक्कम व इतर साहित्य असा ४० हजार ७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्याच्याविरोधात पोलीस हवालदार स्वप्नील कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.दुसरी कारवाई जुना मोटार स्टंँड येथील सार्वजनिक शौचालयाजवळ करण्यात आली. ताडीची अवैध विक्री करणाऱ्या इरफान बशीर खान (रा शनिवार पेठ,सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ हजार २८० रुपयांची २८ लिटर ताडी पोलिसांनी जप्त केली. त्याच्याविरोधात हवालदार ओकांर यादव यांनी फिर्याद दिली आहे.