वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाैंड नंबर ४४२ लगत खासगी मालकी क्षेत्रात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याने वनकर्मचारी व ग्रामस्थांनी जागेवर जाऊन तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. वाघजाईवाडी येथील संजय महिपाल याने त्याच्या शेतीचा बांध जाळताना सुटलेल्या वाºयामुळे आग नियंत्रणात न आल्याने वणवा भडकल्याचे वनाधिकाऱ्यांना दिसून आले. महिपाल यांच्या निष्काळजीपणामुळे वनक्षेत्रात वणवा गेल्याने त्याला वनविभागाने तत्काळ अटक करत त्याच्याविरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब व क अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला. वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल एस. बी. भाट, वनरक्षक विलास वाघमारे व वनमजूरांनी ही कारवाई केली.
वाघजाईवाडीत वणवा लावणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:38 AM