औंध : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध जिल्हा परिषद गटातील नेत्यांना या निवडणूक निकालाचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.औंध जिल्हा परिषद गटात गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे कायम वर्चस्व राहले आहे; परंतु या निवडणुकीत घड्याळ चालू ठेवण्यात त्यांना अपयश आले आहे. तसेच विधानपरिषदेचे आमदार प्रभाकर घार्गे यांचा ही हाच जिल्हा परिषद गट आहे. त्यामुळे बालेकिल्ला मजबूत राहील, अशी सर्वांची अपेक्षा होती. औंध जिल्हा परिषद गटातील एकूण मतांपैकी रणजित देधमुख यांनी ४,६६७ मते घेतली, तर जयाकुमार गोरेयांनी सुतळी बॉम्ब लावून ४,१८६ मते मिळविली. पाठोपाठ शेखर गोरेंनी ‘लक्ष्मी’फटाका लावून ४,०६४ मते तर सदाशिव पोळ यांना २,५५४ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गटात झालेली पिछेहाट ही नेत्यांनी आत्मपरीक्षण करून बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकूणच बाणाने या गटात केलेल्या आतषबाजीची सर्वत्र खुमासदार चर्चा सुरू आहे. तसेच शेखर गोरेंनी पहिल्याच प्रयत्नात बालेकिल्ल्याला लावलेला अॅटोम बॉम्ब हा सुध्दा विषय महत्त्वाचा आहे. जयाकुमार गोरे दोन नंबरची मते घेतील, हा सर्वांचाच अंदाज होता. मात्र, इतर बाबतीत सर्वांचा अंदाज ‘लवंगी फटाका’ ठरला. (वार्ताहर)रणजित देशमुख यांनी तालुक्याचा स्वाभिमान जागृत ठेवून खुद्द औंधमध्ये देखील बाणाने आतषबाजी केली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ‘बाणाची’ आतषबाजी
By admin | Published: October 22, 2014 9:09 PM