कोपर्डे हवेली : विद्यार्थ्यांच्या जीवनाची सुरुवात शालेय जीवनापासून होते. त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांचे कलागुण शोधण्याचे काम स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून केले जाते. जानेवारी, फेबु्रवारी महिन्यांमध्ये विविध शाळा, विद्यालये, महाविद्यालयांची स्रेहसंमेलने आयोजित करण्यात येतात. यातून अनेक कलाकार आपली कला सादर करतात. अशा स्नेहसंमेलनातून आजपर्यंत मोठे कलाकार जन्माला येऊन त्यांना योग्य दिशाही मिळाली आहे. कला सादर करण्यासाठी स्रेहसंमेलनासारखे व्यासपीठ शाळेतून मिळत असते. विद्यार्थी वेगवेगळ्या कलेचे सादरीकरण करीत असताना त्यांच्याकडून गायन, वादन, नृत्य, लोकगीते, तबला, मुलाखती, नाट्य संवाद, एकांकिका, गोंधळी नृत्य पोवाडे, धनगरी ओव्या आदींसह इतर कलांचे सादरीकरण करण्यात येते. सध्याचे बहुतांश मोठे कलाकार त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपली कला सादर होते. त्यातूनच त्यांना संधी मिळत गेली आणि ते यश शिखरावर पोहोचले. बाल्यावस्थेत विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण होण्यास स्रेहसंमेलने महत्त्वाची ठरली आहेत. स्रेहसंमेलनामुळे धिटपणा, आत्मविश्वास, समय सुचकता आदी गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांना होत असतो. (वार्ताहर) युवा महोत्सवातून संधी काही महाविद्यालयांमध्ये ‘युवा महोत्सव’ आयोजित केले जातात. या महोत्सवांमध्ये युवक-युवतीही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या युवा महोत्सवातूनच साखळी पद्धतीने महाविद्यालयांतील कला पथकांची निवड होते. महाविद्यालयीन जीवनात आयोजित करणारे हे ‘युवा महोत्सव’ विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार करतात. शहरी विभागातील शाळांमध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोेजन करून गुणवंत कलाकारांची निवड केली जाते. शालेय जीवनात सादर झालेली ही एकांकिका पुढे मोठा कलाकार जन्माला घालण्यास उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर विद्यार्थ्यांच्या गाण्याच्या स्पर्धा तसेच इतर कार्यक्रम दाखविण्यात येत असल्याने त्या कार्यक्रमांतूनच बाल कलाकारांचा आत्मविश्वास वाढतो.
स्रेहसंमेलनातून कलागुणांना वाव बाल्यावस्थेतच
By admin | Published: February 23, 2015 9:16 PM