बामणोली (सातारा): आमचा गावकरी, आमच्यात राहून मोठा झालेला आणि आम्हाला कधीही न विसरणारा माणूस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे. ते मुख्यमंत्री होण्याचा उत्सव गावात साजरा केला जात असून गावातील सर्व लोकांनी आपल्या घरासमोर गुढया उभारत आनंदोत्सव साजरा केला आहे.सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये एका बाजूला हिरवागार डोंगर त्या डोंगराच्या कुशीत वसलेलं हे छोटसं गाव. आपल्या गावचा एक नागरिक राज्याचे मुख्यमंत्री झालेत म्हणून या गावाने प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून, गुलाल उधळून, गुढी उभी केली आणि आपला आनंदोत्सव साजरा केला. आज खरच खूप मोठा अभिमानाची गोष्टी गोष्ट आहे या गावासाठी त्यांनी स्वप्नही पाहिलं नव्हतं असा दिवस त्यांच्या आयुष्यात उजाडलेला आहे. म्हणूनच त्यांनी हा दिवस गुढीउभारून साजरा केला.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मूळ दरे गावी समजताच गावात जल्लोष साजरा करण्यात आला. गावात गुलालाची उधळण करण्यात आली. गावात प्रत्येक घरासमोर आज गुढी उभारलेली दिसत आहे. अतिशय उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण गावात निर्माण झाले आहे. प्रत्येक घरासमोर रांगोळी अन् नागरिकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट केले त्याचे त्यांना फळ मिळाले आता गावात आणखी सुधारणा होतील असा विश्वास या गावकऱ्यांना आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच मूळ गावात जल्लोष, गुढ्या उभारून केला आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 6:34 PM