शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद

By नितीन काळेल | Published: June 12, 2024 7:25 PM

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच 

सातारा : मागील सहा महिन्यांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. सध्या १४८ टॅंकरवर १४१ गावे आणि ४५३ वाड्यांची तहान अवलंबून आहे. तरीही माणमधील अजुनही ४६ गावे आणि ३१४ वाड्यांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. तसेच जिल्ह्यातील एकाही तालुक्याने १०० टक्क्यांची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नव्हती. तसेच कोयना धरणातही कमी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी झळा सुरू झाल्या होत्या. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गहन झालेला. त्यामुळे अनेक गावांना टॅंकर सुरू होते. तर बहुतांशी गावांना मार्च महिन्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. त्यानंतर दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली.मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात तब्बल २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी २०८ टॅंकरचा धुरळा उडत होता. तर या टॅंकरवर २ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यामध्ये माणमध्येच टंचाई अधिक होती. तालुक्यातील ७१ गावे आणि ४४५ वाड्यांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. ८८ टॅंकरवर सवा लाख लोकांची तहान अवलंबून होती. यानंतर खटाव तालुक्यातही टंचाई वाढलेली. ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले. ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांना ४१ टॅंकरचा आधार होता. त्याचबरोबर फलटण तालुक्यातही ३३ टॅंकर सुरू होते. ४२ गावे आणि ११३ वाड्यांना पाणीपुरवठा होत होता.कोरेगाव तालुक्यातीलही ३३ गावांसाठी २६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. खंडाळा तालुक्यात २, वाईमध्ये ६ गावे आणि ५ वाड्या तसेच पाटण तालुक्यात २ गावे व ८ वाड्या आणि कऱ्हाड तालुक्यातील ७ गावांसाठी टॅंकर सुरू होते. मात्र, मागील आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने टंचाई एकदम कमी झाली आहे.जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १४१ गावे आणि ४५३ वाड्यांत टंचाईची स्थिती आहे. त्यासाठी सध्या १४८ टॅंकर सुरू आहेत. यावर २ लाख १७ हजार ५९१ नागरिक आणि १ लाख ५५ हजार ७४० पशुधनाची तहान अवलंबून आहे. सध्या टंचाईची दाहकता अजुनही माण तालुक्यात आहे. माणमध्ये अजुनही ७० टॅंकर सुरू आहेत. तर खटाव तालुक्यात १७, फलटणला २५, कोरेगाव तालुक्यात २४, खंडाळा १, वाई तालुक्यात ७, जावळीत १ आणि कऱ्हाड तालुक्यात ३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

दुष्काळी तालुक्यात टंचाई कमी..जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि काेरेगाव या दुष्काळी तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, सध्या या तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे टंचाई कमी झालेली आहे. तसेच टॅंकरची संख्याही घटली आहे. सध्या माणमधील ४६ गावे आणि ३१४ वाड्या, खटावमध्ये २१ गावे व ४० वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तसेच फलटणला ३२ गावे आणि ९३ वाड्या आणि कोरेगाव तालुक्यातील २९ गावांसाठी टॅंकर सुरू आहे. पावसाने टंचाई कमी झाल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. तसेच खर्चही कमी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस