पाचगणी : महाबळेश्वरचे मुख्य पीक असलेल्या स्ट्रॉबेरीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, स्ट्रॉबेरीचा दरही उतरला आहे. सध्या ८० ते १०० रुपये किलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री सुरू असून, पर्यटकांमधूनही मागणी वाढली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य पीक आहे. यंदा तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. डिसेंबर महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला. प्रारंभी स्ट्रॉबेरीचा दर प्रति किलो ४०० ते ५०० रुपये होता. मात्र, उत्पादनात वाढ होताच दर उतरत गेले.
स्ट्रॉबेरीचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घसरले
By दीपक शिंदे | Published: April 04, 2023 4:59 PM