शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर

By admin | Published: June 20, 2017 4:26 PM

निरा, देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ; फलटण तालुक्यात बैठकांमध्या ग्रामस्थांना आवाहन

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. २0 : लाभ क्षेत्रात नसलेल्या किंबहुना निरा देवघरचा काडी मात्र संबध नसताना फलटण, खंडाळा तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामती तालुक्याला विकणाऱ्या तथाकथित भगीराथाला तालुक्यातील जनतेने जाब विचारण्याची व आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संर्घष करण्याची वेळ आली आहे. असे मत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केले.निरा देवघर धरणाच्या वस्तुस्थिती मांडण्याबाबत फलटण तालुक्यातील ५१ गावाच्या दौऱ्यात काळज, सासवड, चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरादेवघर कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, सिराज शेख, राजेंद्र काकडे, विलास झणझणे, वसंत ठोबरे, मंज्जाबा खताळ, नंदु गाढवे आदी उपस्थीत होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असुनही आपल्या तालुक्याना सिंचनापासुन वंचीत रहावे लागले नसते. निरा देवघर प्रकल्प सीडब्ल्यूसी (केंद्रीय जल आयोग) मधुन मंजुर होवुन एआयबीपी मधुन भरीव मदत मिळाण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. निरा देवघर प्रकल्प गेली १३ वर्ष जवळपास शंभर टक्के भरत आहे. असे असुनही केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही व त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत का? का जाणीवपुर्वक हे घडविले जात आहे, यांचा विचार करणेची वेळ आता आली आहे.लाभ क्षेत्रात असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. लाभ क्षेत्रात नाहीत ते मात्र अमर्याद व अनिर्बंधपणे पाणी वापर करित आहे हे दुदैर्वी चित्र बदलणे गरजेचे आहे. कालव्याची कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसुनही आपले हक्काचे पाणी कायमस्वरूपी बारामतीला मिळेल व फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहतील असे हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले.

सत्तेचा गैरवापर : नरसिंह निकम

अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव यांनी सुरूवातीपासून प्रयत्न केले आहेत. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प तयार केला त्यांना आद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांच्या जमीनी गेल्या त्यांना शासनाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली गेली नाहीत. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करून लढा उभारणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यातील काही स्वार्थी राजकीय प्रतिनिधी यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्या हक्काचे पाणी बारामती, इंदापुरकडे पळविले आहे. पाणीसाठ्यापैकी ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी घेतले. म्हणजे दहा वर्ष ज्यांचा पाण्याशी संबध नाही ते पाणी वापरत आहेत, असेही ते म्हणाले.