शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

कऱ्हाड येथे डंपरखाली सापडून युवती ठार

By admin | Published: December 23, 2016 11:39 PM

मैत्रीण गंभीर जखमी : सिग्नल ओलांडताना दुचाकी घसरून अपघात

कऱ्हाड : सिग्नल ओलांडण्याच्या गडबडीत डंपरच्या टायरखाली सापडून दुचाकीस्वार युवती जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. कऱ्हाड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप चौकात शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. ध्रुवी नितीन शहा (वय १९, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) असे मृत युवतीचे नाव आहे, तर गंभीर जखमी झालेल्या ईशा श्रीपाल ओसवाल (वय १८, रा. रुक्मिणी इस्टेट, प्रकाशनगर, कऱ्हाड) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप चौकात शुक्रवारी सायंकाळी सिग्नल यंत्रणा सुरू होती. वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते. त्याचवेळी सुपर मार्केटकडून आलेला डंपर (एमएच ११ एएल ४४८८) पोपटभाई पेट्रोल पंप चौकातून कोल्हापूर नाक्याच्या दिशेने निघाला होता. संबंधित डंपरपाठोपाठ धु्रवी शहा व ईशा ओसवाल या मैत्रिणी दुचाकीवरून निघाल्या होत्या. चौकात डंपर वळत असताना या दोघींनी डंपरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक दुचाकी घसरल्याने दोघीही खाली कोसळल्या. ईशा डाव्या बाजूस तर ध्रुवी उजव्या बाजूस पडली. त्यावेळी डंपरचा टायर डोक्यावरून गेल्याने ध्रुवीचा जागीच मृत्यू झाला. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमी ईशाला रुग्णालयात हलविले. ईशा व ध्रुवी क्लाससाठी कोल्हापूर नाक्यावर निघाल्या होत्या, अशी चर्चा घटनास्थळी होती. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (प्रतिनिधी)