शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:21 PM

संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंग

सातारा : विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली असून, ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ याठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व पोलिस बंदोबस्तात सीलबंद करून ठेवली आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत लोकसभा निवडणुकीनंतर निकालाच्या तारखेनंतर ४५ दिवस सुरक्षा कक्षात सीलबंद असलेल्या इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रे याबाबत न्यायालयात कुठल्याही प्रकारची निवडणूक विषयक याचिका दाखल नाही. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करायचा आहे. त्यादृष्टीने यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून २९ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ या ठिकाणी करण्यात आली.दि. २९ ऑगस्ट रोजी याची मॉकपोल प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी प्रथमस्तरीय तपासणीअंती निश्चित झालेल्या एकूण कंट्रोल युनिटच्या संख्येच्या एक टक्के मशिन्सवर १२००, दोन टक्के मशीन्सवर १००० आणि २ टक्के मशीन्सवर ५०० इतके मतदान राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात आले. याकामी बेल कंपनीचे तज्ज्ञ अभियंते व जिल्ह्यातील महसूल कर्मचारी यांच्या साहाय्याने राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याकामी नियुक्त नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख यांच्या देखरेखीखाली व पोलिस बंदोबस्तात संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.ही सर्व प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अनिल जाधव व निवडणूक शाखेच्या वतीने पार पडली. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली असून, सद्य:स्थितीत ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, गोदाम क्र. १ याठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली व पोलिस बंदोबस्तात सीलबंद करून ठेवण्यात आली आहेत.संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंगया संपूर्ण प्रक्रियेचे वेबकास्टिंग केले आहे. त्यामुळे निवडणूक विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर लक्ष ठेवता आले. शिवाय पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvidhan sabhaविधानसभाEVM Machineईव्हीएम मशीन