सातारा : कोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले. दुसºयांदा हे पदक मिळविणारे महाराष्ट्रातील वसंत साबळे हे एकमेव पोलीस कर्मचारी आहेत.वसंत साबळे हे १९८४ मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलात भरती झाले. खंडाळा, फलटण, क-हाड, सातारा येथे अखंडित ३६ वर्षे त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्याकडे सहायक म्हणून कार्यरत आहेत.
आत्तापर्यंत सेवा कालावधीत त्यांनी फलटण येथील गुंड कानिफ घोलप याच्यावरील खुनी हल्ला, कºहाड येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण व खून प्रकरण, बोगस पत्रकार झपाटे-पाटोळे प्रकरण, महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्यावरील गोळीबार प्रकरण, वाई येथील खून खटला, मांढरदेव दुर्घटना चौकशी, सोनगाव येथे शेतात जप्त केलेली लाखो रुपयांची गांजा शेती, कोट्यवधींचे अपहार प्रकरण, अवैध रिव्हॉल्वर जप्त, कोरेगाव, पळशी येथील अफरातफरींचे गुन्हे, दरोडे, चोरी अशा शेकडो गुंतागुंतीचे त्यांनी तपास केले. तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना न्यायालयातील खटल्याकामी माहिती पुरविण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या केसेसमध्ये अनेक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यांना आत्तापर्यंत ५५० पेक्षा जादा रिवॉर्ड, सन्मानपत्रे मिळालेली असून, बक्षिसांची रक्कम लाखापेक्षा जास्त आहे. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, राष्ट्रपती भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती मेडल, दोन जादा वेतन वाढी, गुन्हे तपासाच्या कौशल्यासाठी तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे.
सहायक फौजदार वसंत साबळे हे उत्कृष्ट जलतरणपटू आहेत. तसेच २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. त्यांना दुसºयांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, सुहास गरूड, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, बी. आर. पाटील, संभाजी पाटील आदींने त्यांचे कौतुक केले.
- लोणंदच्या सुपुत्रालाही राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर
लोणंद : नक्षलवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी अग्रभागी अशा उ-६० कमांडो पथकाचे माजी प्रमुख लोणंदचे सुपुत्र समीरसिंह साळवे आणि टीमने गडचिरोलीमधील अबुजमाड जंगलात नक्षलवादाचा प्रतिबंध करत अतुलनीय कामगिरी केली होती. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित होणारे लोणंदमधील हे दुसरे पोलीस अधिकारी असून, २००८ रोजी पोलीस अधिकारी रवींद्र डोईफोडे यांनाही राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.सध्या समीरसिंह साळवे हे नाशिक येथील मनमाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. याबद्दल त्यांचे लोणंदमधील मान्यवर व डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांचे कौतुक केले.