सातारा : शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आंतरजातीय विवाह केल्यावर सरकारकडून तीन लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून त्याच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.प्रिन्स भगत, विजया भगत, आलिशा भगत व दोन प्रिन्स याच्या दोन मावशा (नावे माहीत नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संशयित प्रिन्स याने पीडित १७ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्यास सरकारकडून तीन लाख रुपयांचे अनुदान मिळेल, असे आमिष दाखवले. त्यांतर त्याने तिच्यासोबत लग्न करून तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केले.
तसेच तिच्यासोबतचे काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. असे कृत्य करण्यासाठी त्याला इतर संशयितांनी मदत केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. के. माने हे करत आहेत.