शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे आक्रमण!

By admin | Published: June 28, 2015 10:29 PM

शेतकरी हवालदिल : खर्च जाणार वाया ; फलटण पूर्व भागातील चित्र

दुधेबावी : फलटण पूर्व भागातील दुधेबावी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, वडले, सोनवडी, मिरढे, जावली या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब बागांची लागवड केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. सध्या या डाळिंब बागांवर तेल्या रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.दुधेबावी परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी सामना करत डाळिंब बागा फुलवल्या आहेत. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने या बागांची पाहणी करून या तेल्या रोगाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करावे. सध्यस्थितीत डाळिंब बागा तेल्यामुक्त करणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावरुन प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.डाळिंब बागेतील एका झाडाला तेल्या रोग झाला तर तो पूर्ण बागेत पसरत आहे. त्यामुळे झाडे मुळासहित काढुन टाकावी लागत आहेत. सुमारे दीड ते दोन वर्षे खर्च करुन वाढवलेली बाग काढुन टाकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी टँकरद्वारे विकत पाणी घेऊन डाळिंबाची झाडे जगवण्याचे काम केले आहे. त्यावेळी पाण्याचा एक टँकर सुमारे सातशे रुपयाला मिळत होता. तसेच सेंद्रीय व रासायनिक खतेही फळबागांना घातली आहेत. ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे पंचवीस हजार रुपये इतका खर्च केला आहे.सध्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहार घेतला आहे. पावसाचे पाणी कळीवर अथवा फळावर पडून त्यावर टिपका हा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)डाळिंबावरील तेल्या रोगावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात यावर चर्चासत्र घेणे अपेक्षित आहे.-विकास सोनवलकर, डाळिंबधारक, शेतकरी