लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या कातरखटावच्या पोलीस हवालदारावर दोन युवकांनी कुकरीने वार करून प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर मायणी पोलिसांनी थरारक पाठलाग करून हल्लेखोरांना पकडले. या हल्ल्यात जखमी झालेले हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावर वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अल्ताफ मोहन काळे व बशीर मोहन काळे या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवार्ई करण्यासाठी कातरखटाव येथे हवालदार वायदंडे हे गेले होते. यावेळी अचानक कातरखटाव येथील कात्रेश्वर चौकात संशयित आरोपी व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी हवालदार वायदंडे यांच्यावर कुकरीने हल्ला केला. वायदंडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हातावर तसेच पाठीवरही वार करण्यात आले. या घटनेनंतर सर्व संशयित आरोपींनी तेथून पलायन केले. वायदंडे यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी बशीर मोहन काळे (वय २१), अल्ताफ मोहन काळे (२४), वैशाली बशीर काळे (२०), सारिका अल्ताफ काळे (२१), सुनीता मोहन काळे (५०) यांच्यावर ३९५ (दरोडा), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३२३ (मारहाण), ५०४, ५०६ (संगनमत) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के करीत आहेत.पोलिसांना ग्रामस्थांचीही साथ !यावेळी सहायक फौजदार गुलाबराव दौलताडे, संजय देवकुळे, पोलिस नाईक राहुल सरतापे, नाना कारंडे, बापूराव खांडेकर, प्रकाश कोळी, बुधावले, विठ्ठल पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने संशयितांना पकडले. संशयितांकडून धारधार शस्त्र, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे व पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी युवक तसेच ग्रामस्थांचे प्रत्यक्ष भेटून कौत
कातरखटावच्या पोलिसावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:35 PM