शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

गटबाजी रोगाला ‘हल्लाबोल’ उतारा-राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व पहिली रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:06 PM

सातारा : सत्ता हातातून निघून जाताच राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता निवडणुकीपूर्वी पुन्हा कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे.

ठळक मुद्देअंतर्गत धुसफूस अडचणीची

सागर गुजर। 

सातारा : सत्ता हातातून निघून जाताच राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता निवडणुकीपूर्वी पुन्हा कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे ही पांगापांग थांबविण्याचे मोठे आव्हान आहे.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये घरगळती सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषदा तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक बिनीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले. भाजपची झूल पांघरलेले हे कार्यकर्ते राष्ट्रवादीलाच डोईजड झाले. ही गळती थांबता-थांबेना अशीच आहे.राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भोगलेल्या खंडाळ्याच्या नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील यांनीही सवता सुभा मांडला आहे.

कोरेगावात राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट कार्यरत आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील व त्यांचे चिरंजीव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांचा एक गट आणि आमदार शशिकांत शिंदे यांचा दुसरा गट या ठिकाणी कार्यरत आहे.सातारा तालुक्यात कोडोली, देगाव, शिवथर, मालगाव, माहुली या भागांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची नेहमीच धूसफूस सुरु असते.खटाव तालुक्यात तर राष्ट्रवादीची एकसंध ताकदच नाही. या तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने नेतृत्वाचा अभाव आहे.

माण तालुक्यात माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या कुटुंबाला पक्षाने योग्य न्याय दिला नसल्याची भावना मार्डी परिसरातील त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.कऱ्हाड उत्तरच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना स्वपक्षापेक्षा स्वत:ची ताकदच आजमावी लागली होती. त्यांचे विरोधक वाढतच चालले आहेत.कºहाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीची ताकद क्षीण आहे. काँगे्रसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार विलासकाका पाटील आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले या तिघांतील संघर्षात राष्ट्रवादीचे अस्तित्व नगण्य ठरत चालले आहे.पाटणमध्ये राष्ट्रवादीअंतर्गतच गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पाटणकर गटाचे विक्रमबाबा पाटणकर हे बाजार समितीमधील अविश्वास ठरावानंतर नाराज झाले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याविरोधात त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतली आहे.साताºयात राष्ट्रवादीअंतर्गतच राजेंचे दोन गट आहेत. मनोमिलन तुटल्यानंतर पडलेली फाकळी आणखीच विस्कटल्याचे दिसत आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्षामध्ये दिवसेंदिवस ठिणग्या पडतच आहेत.या विस्कटलेल्या अवस्थेत राष्ट्रवादी पक्ष संघर्षासाठी सज्ज झाला आहे. आमदार अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ही नेतेमंडळी ८ व ९ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहेत.सत्ता नसल्याने सुरु असलेली पांगापांग थांबवून कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी ही मंडळी काय संदेश देतात, याची उत्सुकता आहे.उदयनराजे व्यासपीठावर येतील का?राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमाकडे त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी पाठ फिरवली होती. आता संघर्षाचा बेत आखून राष्ट्रवादीचे नेते साताऱ्यात येणार आहेत.सातारा जिल्ह्यात दहिवडी, कोरेगाव, सातारा, वाई, पाटण, उंब्रज येथे जाहीर सभा होणार आहेत. या सभांच्या व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले येण्याची शक्यता कमी आहे, तरीही लोकांना मात्र या घटनेची उत्सुकता आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर