शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

औंध : मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आज अष्टमी उत्सव : औंधमध्ये भक्तिमय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:09 PM

येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे.

ठळक मुद्देमूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. अष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम देवीची पालखी मिरवणूक डोंगरावर काढली जाणार

औंध : येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीच्या अष्टमी उत्सवानिमित बुधवारी देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मूळपीठ डोंगर भाविकांनी फुलणार आहे. अष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळपीठनिवासिनी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी तसेच श्री कराडदेवी येथे नवरात्रोत्सवानिमित मागील आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

बुधवार, दि. १० रोजी कराडदेवीचे पूजन करून पुण्यहवाचन करून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व चारुशिलाराजे यांच्या हस्ते देवीची मकरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर नियमित दुपारी व रात्री महानैवेद्य महाआरती, मंत्रपुष्पांजली तसेच नियमित गजाननबुवा कुरोलीकर यांचे सायंकाळी हरिदासी व रात्री कराडदेवी येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. देवीच्या पाट्यापूजन ओटी पूजनाचा कार्यक्रमही झाला आहे.

मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सवानिमित मूळपीठ डोंगरावर दुपारी दोन ते तीन या वेळेत मंदिरातील उत्सवमूर्तीचे पूजन केले जाणार आहे. यावेळी श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीची पालखी मिरवणूक डोंगरावर काढली जाणार आहे. यावेळी पाच प्रदक्षिणादरम्यान विविध देवतांना भेटी देऊन उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटून यात्रोत्सव होणार आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांमध्ये हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मूळपीठ गर्दी केली होती. यावेळी मिनीबसची ही सोय एसटी विभागाने केली आहे.

गुरुवार, दि. १८ रोजी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमांबरोबर देवीची घटउत्थापना कार्यक्रमाबरोबर कुमार-कुमारी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नवरात्र पाठांची ब्राह्मण दक्षिणा, सुहासिनींना दक्षिणा, खण, साडी, नारळाने ओटी भरणे, दक्षिणा देणे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच नियमित दोन वेळेस वाद्यवृंदाची सलामी दिली जाणार आहे. तसेच राजवाड्यातील शस्त्रपूजा केली जाणार आहे. त्यानंतर औंध येथील ग्रामस्थांना राजवाड्यात दसरा उत्सवानिमित जेवण दिले जाणार आहे.

औंध गावातील श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करून, वाद्यवृंदाची सलामी देऊन देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी निघणार आहे. तसेच औंध गावातील होळीचा टेक, केदार चौकमार्गे गावाच्या उत्तरेकडील काजळवडानजीच्या सीमेवर देवीची पालखी नेऊन औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवर, मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर डब्बे लावून गोळीबार केला जाणार आहे. पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

देवीची पूजा बांधणी आकर्षक..ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीची मागील सात दिवस घटावरील, झोपाळ्यावर आरुढ पूजा, मोरावर आरुढ, सरस्वती रुपातील, सालंक्रू त पूजा, शिवरुपातील, विविध रुपातील बैठी व आकर्षक देवीची वेगवेगळ्या रुपातील पूजा पुजारी बांधवांच्या वतीने बांधल्या.शंभरहून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठीनवरात्र उत्सवामुळे मागील पाच दिवसांपासून औंध येथे मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र, रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला होता. तसेच होमगार्ड व पोलीस मिळून सुमारे १०० च्या आसपास कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी तैनात आहेत.

 

 

टॅग्स :TempleमंदिरSatara areaसातारा परिसर