महाबळेश्वर : तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर देण्याबाबत प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना सर्वांना आदेश दिले आहेत.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत वाई विभागाच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने घेण्यात आली. बैठकीला तहसीलदार सुषमा चौधरी पाटील या उपस्थित होत्या.
प्रांताधिकारी म्हणाल्या, आप आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष ठेवून वेळोवेळी नुकसानीचे स्वरूप व प्रकार त्वरित कळविण्यात यावे. तसेच तालुक्यातील विविध भागांतील रस्त्यांची वाहतूक आवश्यक तिथे वळविण्याच्या सूचना देत पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांनी हॉटेलमधून बाहेर पडू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
बैठकीला तहसीलदार पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी नारायण घोलप, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील तसेच महाबळेश्वर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील विभागप्रमुख उपस्थित होते.
फोटो - वाई विभागाच्या उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरातील हिरडा विश्रामगृह येथील सभागृहात