सातारा : ‘महाराष्ट्र शासनाचा मिळालेला गुणवंत अधिकारी पुरस्कार हा केवळ माझा नसून तो खऱ्याअर्थाने प्रशासनाला भरभरून साथ देणाऱ्या जनतेचा आणि आपल्या कर्तव्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, तसेच आजवरच्या प्रशासकीय कारकीर्दीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या सहकारी अधिकारी बंधूंचा आहे’, असे मत जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर जाधव यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील उच्च कामगिरी एकट्याने शक्य नाही. जिल्हा परिषदेत काम करीत असताना आतापर्यंतच्या सर्वच वरिष्ठांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. त्यांचा मी ऋणी आहे. विविध पातळीवर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन केले गेले. अधिकारी मित्रांनीसुद्धा वेळोवेळी कौतुक केले आणि सहकार्यही केले. या सर्वांमुळे महाराष्ट्र शासनाचा मानाचा, महत्त्वाचा समजला जाणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांबरोबरच आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबियांची मोलाची साथ खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यांचा देखील मी ऋणी आहे.
माझ्यासोबतच जिल्हा परिषदेतील एक गुणवान कर्मचारी अवधूत वेल्हाळ यांना देखील गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझा आनंद दि्वगुणित झाला आहे, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.
फोटो २३सातारा झेडपी नावाने...
फोटोसह घ्यावी, ही विनंती...
फोटो ओळ :
सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अविनाश फडतरे, किरण सायमोते, विनायक पवार आदी उपस्थित होते.
.........................................................................