सातारा : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना साताऱ्यासह जिल्ह्यात शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने साताऱ्यातील चौकाचौकांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘क्रांतिसूर्य’ या लोकराज्यच्या विशेष अंकाचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, बँक आॅफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक हरिश्चंद्र माझीरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, तहसीलदार विवेक जाधव, नेताजी कुंभारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मिरवणुकीत विविध चित्ररथही...महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात ठिकठिकाणी तरुणांनी ‘भीमज्योत’ आणली. तसेच साताऱ्यातून शुक्रवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये विविध चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग चिमुरड्यांनी सादर केले. भगवे फेटे घातलेल्या तरुणींनी झांज खेळाचे नयनरम्य प्रात्यक्षिक करून दाखविले.
अवघा जिल्हा ‘भीम$’मय..
By admin | Published: April 14, 2017 10:12 PM