शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

 गाडी मागे घे बोलला अन् ‘इगो’ दुखावला; दोन गोळ्या झाडल्या, सहा जणांवर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Published: December 28, 2023 8:13 PM

कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला.

सातारा: येथील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर एका तरुणाने दुचाकीस्वाराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने या गोळ्या संबंधित तरुणाला लागल्या नसून, यात तो बालंबाल बचावला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज ढाणे (रा. मंगळवार पेठ, सातारा), हर्षद शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यासह चार अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कमानी हौदाजवळ गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हर्षद शेख हा काही तरुणांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी रस्त्यात आडवी उभी केली होती. विशाल अनिल वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दुचाकीवरून तेथून जात होता. त्यावेळी त्याने हर्षदला दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. तेव्हा त्याने घेणार नाही, तुला काय करायचे तर कर, असं सांगितल्यानंतर विशाल याने त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने रस्त्याच्याकडेने काढून तो तेथून निघून गेला. 

पानटपरीजवळ ठेवलेला मावा घेऊन तो परत तेथून जात असताना हर्षदने त्याला थांबवले. थांब तुला दाखवतो, असे म्हणत त्याने धीरज ढाणे याला फोन केला. काही वेळातच ढाणे त्याच्या काही मित्रांना घेऊन तेथे आला. त्याने विशाल याला मारहाण करण्यास सुरुवात केली. विशालसोबत असलेला त्याचा मित्र विक्रम यादव हा वाद सोडवत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. विक्रमने ‘तू पळून जा,’ असं म्हणत विशालला ढकलले. त्यानंतर विशाल पळून जात असताना धीरज ढाणे याने त्याच्याकडील पिस्तुलामधून दोन गोळ्या त्याच्या दिशेने झाडल्या. मात्र, सुदैवाने त्या गोळ्या विशालला लागल्या नाहीत. अंधारात एका घराच्या आडोशाला विशाल लपून बसला. रात्रीचा दंगा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. हे दिसताच धीरज ढाणे, हर्षद शेख व त्याचे इतर साथीदार तेथून पसार झाले.विशाल वायदंडे याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हर्षद शेख, धीरज ढाणे याच्यासह सहा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपींच्या शोधासाठी पथक तैनातगोळीबाराची घटना सातारा शहरात घडल्याचे समजताच शहरात प्रचंड खळबळ उडाली. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आले असून, लवकरच संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :satara-acसाताराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस