पुसेगाव : खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे, तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनलविरुद्ध आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे जी.डी. खुस्पे यांचे पॅनल अशी लढत झाली. यामध्ये आमदार महेश शिंदे गटाच्या पॅनलने नऊ जागा जिंकत निढळ ग्रामपंचायतीत तब्बल १० वर्षांनंतर सत्तांतर घडविले, तर चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या.
निढळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि. २६) रोजी दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी बायडाबाई ठोंबरे, तर उपसरपंचपदासाठी श्रीकांत खुस्पे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी तथा विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी बबन ढेंबरे यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली. यावेळी गजानन खुस्पे, संजय भोंडवे, कैलास भोसले, नवनाथ खुस्पे, दत्तात्रेय जाधव, रेखा घाडगे, राजश्री जाधव, कला काळंगे, चारुशीला इंजे, मंदा पवार, संदीप दळवी, ताया खुस्पे, साहेबराव पाटील, भीमराव पाटील, संजय खुस्पे, विजय शिंदे, अमित खुस्पे, सुभाष घाडगे, अनिल ठोंबरे उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना आमदार महेश शिंदे, गजानन खुस्पे यांनी कौतुक केले.
२८निढळ
फोटो ओळ : निढळ (ता. खटाव) नूतन सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांसमवेत गजानन खुस्पे व इतर उपस्थित होते.