वडूज : पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगलप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सतरा जणांना वडूज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी रात्री पुसेसावळी येथे दंगल झाली होती. या दंगलीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी जयराम अशोक नागमल, किरण गोरख घार्गे, दादासो मारुती माळी, शिवाजी विनायक पवार, जोतिराम आनंदराव भाडगुळे, विजय बजीरंग निंबाळकर, किशोर शहाजी कदम, महेश रामचंद्र कदम, सोमनाथ बाबूराव पवार, श्रीनाथ हणमंत कदम, विकास वसंत घाडगे, अनुरुद्ध सतीश देशमाने, नीलेश अनिल सावंत, सागर सिद्धनाथ सावंत, प्रमोद भरत कोळी, सुमीत चंद्रकांत जाधव, सागर संपत जाधव यांना अटक करून वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता शनिवार, दि. १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर पोलिस कोठडी संपुष्टात आल्यानंतर सतरा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. रविवारी सतरा जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सतरा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या सतरा जणांना वडूज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याकामी ॲड. श्रीनिवास मुळे यांनी काम पाहिले.
Satara- पुसेसावळी दंगल: सतरा जणांना जामीन मंजूर
By दीपक शिंदे | Published: October 09, 2023 7:01 PM