कार्वे : सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर खोडशी बंधारा बांधून ते पाणी कऱ्हाड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यांना देऊन हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली घेण्यात आले. येथील कृष्णा कालव्यास नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. परिसरात असंख्य छोटे कालवे असूनही या कालव्यात मात्र मार्च महिन्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.कऱ्हाड तालुक्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या टेंभू योजनेचे कालवे, धोम कालवे, कन्हेर कालवे, ताकारी कालवे, नीरा कालवे पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. मात्र, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या कृष्णा कालव्यास नक्की कोणत्या धरणाचे पाणी वाटणीस आले आहे. याबाबत पाटबंधारे अधिकारी, प्रतिनिधींमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.कृष्णा कालव्यास पूर्वी धोम, कण्हेर तसेच आरफळ आदी धरणांतून पाणी सोडण्यात येत होते. मात्र, पाणी दुष्काळी भागात पिण्यासाठी, जनावरे व शेतजमिनीसाठी वळविण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा कालव्यास प्रतीक्षा करावी लागते. पाणी वळविण्यात आल्याने येथील परिसरातील शेतजमिनीतील पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळालेले नाही. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरबरा, पालेभाज्या, भुईमूग पीक उत्पादनात कमालीची घट झाल्याचे दिसून येते. तसेच ऊस पिके करपून चालली आहेत. शेतकरी खातेदार यांना रब्बी हंगाम पिकांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच सरकारी पाणीसारा माफ करून त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनधी)कालव्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षकऱ्हाड तालुक्यात सध्या अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. शेती व पिण्यासाठी कऱ्हाड तालुक्यात एकूण ६१ पाझर तलावांची संख्या आहे. त्यापैकी ४४ तलाव हे अद्याप कोरडे आहेत. येथील कृष्णा कालवा उपविभाग कऱ्हाड अंतर्गत सैदापूर, गोवारे, सयापूर, टेंभू, कोरेगाव, कार्वे, दुशेरे, कोडोली, शेरे, शेणोली, रेठरे बुद्रुक, वाळवा आदी गावे येतात. कोरड्या व ठणठणाट पडलेल्या कृष्णा कालव्यात अनेक ठिकाणी दगड ढासळले असून, त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासानाकडून दुर्लक्ष होत आहे. कृष्णा कालव्यास त्वरित पाणी सोडावे, याकरिता अभियंता, कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग कऱ्हाड यांना निवेदन देण्यात आले आहे. वेळेत पाणी देऊन दखल घ्यावी, अन्यथा पाण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.- निवासराव थोरात,अध्यक्ष, कृष्णा कालवा पाणी वाटप संस्था, कार्वेपरिसरातील शेतकरी सभासदांनी व कृष्णा कालवा पाणी वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली पाणी सोडण्याची मागणी रास्त आहे. ही मागणी शासनदरबारी पोहोचवून याकरिता पाठपुरावा केला जाईल.- बी. आर. पाटील,उपअभियंता, कृष्णा कालवा, पाटबंधारे विभाग, कऱ्हाडउन्हाळ्याच्या तोंडावरच कऱ्हाड तालुक्यात्ील कृष्णा कालवा पाण्याअभावी कोरडा पडला आहे. कालव्यात पाणी नसल्याचे पिके होरपळून चालली आहेत.
बाला रफिक शेखने दाखवले माउलीला अस्मान
By admin | Published: March 18, 2017 9:33 PM