वाई : जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या बलवडी व धोम धरण पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारी बलकवडी ९८.५७ तर धोम धरण ९२.५२ टक्के भरले आहे. सध्या बलकवडी धरणातू ४७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गणेश विसर्जनासाठी धोम धरणातून कृष्णा नदीत बुधवारी पाणी सोडण्यात आले आहे. जुलै, आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळाधार पावसाने तळ गाठलेल्या बलकवडी व धोम धरण कमी कालावधीत पूर्ण क्षमतेने भरले. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बलकवडी धरण अवघ्या वीस दिवसांत भरले तर बलकवडीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर व जांभळी बंधारा भरून वाहू लागल्याने कमंडलू नदीला पूर आल्यामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. धरण ४५ दिवसांत पूर्ण क्षमतेने भरले.दोन्ही धरणे भरल्याने धोम धरणाखालील तालुक्यातील शेतजमिनीचा तसेच खंडाळा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या तालुक्यातील सिंचन व शेतीसाठी आता पाणी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)धोम धरणाची एकूण पाणी क्षमता १३.५0 टीएमसी तर धोम-बलकवडी धरणाची एकूण क्षमता 0४.0८ टीएमसी इतकी आहे. धोम धरणात बुधवारी १२.६४ तर बलकवडी धरणात ४.३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धोम पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ०.८६ टीएमसी पाण्याची गरज आहे.
बलकवडी ९८ तर धोम ९२ टक्के भरल
By admin | Published: September 03, 2014 8:44 PM