शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जावळी तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By admin | Published: April 17, 2017 11:17 PM

सातबारा कोरा करण्याची मागणी : शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन; शेतकऱ्यांचा सहभाग

मेढा : जावळीतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, मेढा व आठ गावे प्रादेशिक नळ योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. यासह विविध मागण्यांसाठी जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने बैलगाड्यांसह जावळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी जावळी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.मेढा एसटी डेपो ते जावळी तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व सेनेचे जावळी-सातारा विधानसभा क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, तालुकाप्रमुख प्रशांत तरडे, संजय सुर्वे यांनी केले. यावेळी जावळीच्या तहसीलदारांना सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवसेनेचे एस. एस. पार्टे गुरुजी, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, तालुकाप्रमुख संजय सुर्वे, प्रशांत तरडे, संजय सपकाळ आदींच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांसह मोर्चाला एसटी डेपोपासून सुरुवात झाली. एसटी डेपो, वेण्णा चौक, मुख्य बाजार चौकातून हा मोर्चा जावळी तहसील कार्यालयावर आला. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाड्या होत्या. बैलगाडीसह मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात नेण्यात आला. यावेळी सातबारा कोरा झालाच पाहिजे, मेढा प्रादेशिक पाणी योजनेची चौकशी झालीच पाहिजे आदी घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. शासनाने या मोर्चाची दखल घ्यावी. अन्यथा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी एस. एस. पार्टे गुरुजी, चंद्रकांत जाधव आदींची भाषणे झाली. सेनेचे सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सपकाळ, संतोष शेलार यांच्यासह विविध शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)निवेदनातील या आहेत मागण्याजावळीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून मिळावा, शेतकऱ्यांना बँका, पतसंस्थांकडून सुरू असणारा वसुलीचा तगादा थांबवावा, बोंडारवाडी धरण व्हावे, लाईट बिलातील इतर आकारण्या बंद होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात मेढा व आठ गावे प्रादेशिक नळ योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना योग्य तो न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.