...............................
वाहन अपघातामुळे गतिरोधकची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधाव असतात. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी गतिरोधकची मागणी होत आहे.
...........................................................
कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधी
सातारा : येथील गोडोलीतून रहिमतपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचा ढीग पडला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सातारा शहरात कचरा नेण्यासाठी घंटागाडी असली तरी अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. अशाचप्रकारे गोडोलीतून रहिमतपूर बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यानंतर हा कचरा रस्त्यावरही येतो. तसेच कचऱ्याच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे.
..............................................................