जावेद खान ।सातारा : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडविण्याचा छंद अनेकांना असतो. सातारा जिल्ह्यातही पतंग उडविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हा छंद जोपासत असताना पतंगासाठी वापरला जाणारा जायनीज मांजा सध्या जीवावर बेतू लागला आहे. या मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी बाजारपेठेत याची सर्रास विक्री केली जात आहे.
बरेली, मुंबई, गुजरात व बेळगाव या ठिकाणाहून साता-यात तयार पतंगांची आवक होत आहे. पतंगांच्या विक्रीतून पाच ते सहा महिन्यांत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यंदा एक व दोन रुपयांचे पतंग बंद झाल्याने तीस ते पन्नास रुपयांपर्यंत पतंगांचे दर आहेत. पतंग उडविण्यासाठी पूर्वी साध्या दोºयाचा वापर केला जायचा. परंतु युवकांमध्ये पतंगांच्या काटाकाटीची स्पर्धा सुरू झाली अन् यासाठी विशिष्ट प्रकारच्या मांजाचा वापर केला जाऊ लागला.
काही वर्षाांपासून चायनीज तंगुसापासून बनविलेल्या ‘च्यावम्याव’ मांजाला तरुणांकडून मागणी वाढू लागली आहे. या मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. याचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर शासनाकडून या चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. परंतु साताºयात आजही या मांजाचा काळा बाजार सुरू असल्याचे दिसून आले आहे. चायनीज मांजाची काही दुकानदारांकडून अधिक पैशाने सर्रास विक्री केली जात आहे. करंजे, सदर बझार, समर्थ मंदिर, दस्तगीर कॉलनी या भागात हा मांजा मिळत असल्याचे लहान मुले सांगतात. तरी देखील कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कॉटन मांजा विक्रीसचायना मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने या मांजावर बंदी घालण्यात आली. यानंतर बाजारात कॉटनचा मांजा विक्रीस आला. या मांजाची एक रीळ साधारण ८० ते १०० रुपयांना मिळत आहे. तरुणांकडून याच मांजाचा पतंगासाठी वापर केला जात आहे.
शहरात काही ठिकाणी चायनीज मांजा मिळत आहे. त्यामुळे लहान मुले हा मांजा खरेदी करीत आहेत. मुलांनी कॉटनचाच मांजा घ्यावा, याबाबत आम्ही प्रबोधन करत आहे.- अय्याज मोमीन, व्यावसायिक
सातारा शहरातील दुकाने विविधरंगी पतंगांनी सजली असून, बरेली, गुजरात, बेळगाव या ठिकाणाहून पतंगांची मोठी आवक झाली आहे.