शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

बँक कधीच फोन नाही करत, तुम्ही फसताय कसे परत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 5:29 AM

अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न । फोनवर माहिती देताना सतर्क राहण्याची गरज

दत्ता यादव 

सातारा : तुमच्या एटीएमची मुदत संपलीय. एटीएम काही वेळात बंद होईल, अशाप्रकारची माहिती सांगून लोकांना संभ्रमात टाकले जाते. एटीएम हे अत्यंत गरजेचे असल्यामुळे फोन आलेल्या व्यक्तीला वेळ न दवडता आणि विचार न करता आपण इत्थंभूत माहिती पटापटा सांगू लागतो. परंतु काही वेळातच आपल्या बँकेच्या खात्यावरून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस येतो, तेव्हाच कळते आपली फसवणूक झालीय. परंतु तोपर्यंत फार वेळ झालेला असतो. मात्र, आपली फसवणूक टाळण्यासाठी फक्त आणि फक्त सतर्कताच तुमच्या कामी येणार आहे. अलीकडे लोकांना फसविण्याचे नवनवीन फंडे पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘फोन कॉल गंडा.’ या एका फोनमुळे अनेकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून डॉक्टरांपासून व्यावसायिकांपर्यंत कोणीच सुटले नाही.

महिनाभरापूर्वी साताºयातील प्रसिद्ध डॉक्टरांना असाच एक फोन आला. त्यांना संबंधिताने तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे. केवळ तुमचा एक मिनिट द्या, थोडी माहिती हवी आहे. असे सांगितले. डॉक्टरांनी कसलीही विचारपूस न करता संबंधिताला त्यांचे बँक डिटेल्स दिले. परंतु तासाभरानंतर डॉक्टरांच्या मोबाईलवर एसएमएस आला. त्यांच्या खात्यातून तब्बल ६ लाख रुपये काढले गेले होते. हा एसएमएस पाहून डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण उच्चशिक्षित असतानाही अशा प्रकारच्या फोनला बळी पडलो, याचे शल्य त्यांच्या मनामध्ये राहिले.आपले पैसे गेले यापेक्षा आपण फसलो गेलो, हे समाजाला आणि आपल्या आप्तस्वकीयांना कळू नये, अशी त्यांची धारणा होती. या डॉक्टरांप्रमाणेच अनेक व्यावसायकही अशा फोन कॉल्समुळे फसले गेले आहेत.वास्तविक अशा प्रकारच्या फोन कॉल्सना उच्चशिक्षित लोकही कसे बळी पडतात, याचे अप्रूपसगळ्यांनाच असते. परंतु त्यावेळची परिस्थिती, विचार करण्याची क्षमता आणि सतर्कतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा लोकांची फसगत होत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. खरं तर बँकेमधून अशाप्रकारचे फोन केले जातात का? हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते आपल्या बँक खात्याची माहिती देत असतात.इथेच लोकांची मोठी फसगत होत असते.काय काळजी घ्याल?४अनोळखी व्यक्तीने बँक डिटेल्स विचारल्यासमाहिती देऊ नका.४अनोळखीने मोबाईलवर पाठविलेली कोणतीही लिंक्स उघडू नका. त्या लगेच डिलिट करा.४बँकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही मोबाईलवरून देऊ नका.४लॉटरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल, कॉल, एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, त्याकडे दुर्लक्ष करा.एटीएमची मुदत त्यावर लिहिलेली असते. एटीएमची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर खातेदाराला मेल किंवा पत्राद्वारे कळविले जाते. बँकेत आल्यानंतर खातेदाराला दुसरे एटीएम दिले जाते. परंतु एटीएम खराब आहे की, बंद पडले आहे, हे बँकेला कधीही समजत नाही. फक्त एटीएमची मुदत संपणार आहे, हे बँकेला समजतं. मात्र, बँकेतून फोन कधीही केला जात नाही. एटीएमच्या पाठीमागे सीव्हीव्ही नंबर असतो. तो नंबर कुठल्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका.- सर्फराज शेख, ब्रँच मॅनेजर, एचडीएफसी बँक, साताराफसगत होण्याची कारणे..४घाईगडबडीत फोन उचलून समोरची व्यक्ती कोण बोलतेय, याची चौकशी न करता त्याकडे दुर्लक्ष करणे.४अनोळखी व्यक्तीला नाही कसे म्हणू, त्याला काय वाटेल, अशी वाटणारी खंत४बँकेतूनच फोन केला गेला आहे, असे वाटणे.४बँकेतून फोन करून खातेदाराची माहिती घेतली जात नाही, हे माहिती नसणे.बँक डिटेल्स मागविण्याचा अधिकार नाही४‘तुमचे एटीएम बंद होणार आहे. किंवा बंद पडले आहे. सुरू करायचे असेल तर एटीएमचा नंबर सांगा,’ अशा प्रकारचा फोन बँकेमधून कधीच केला जात नाही.४कारण बँकेलाच नव्हे तर कस्टमर केअरलाही खातेदाराला फोन करून खातेदाराचे बँक डिटेल्स मागविण्याचाअधिकार नाही.४समजा तुमच्या एटीएमची मुदत संपणार आहे. त्या वेळीबँकेतून अगोदरच तुम्हाला पत्र किंवा मेल केला जातो. त्या वेळीखातेदार बँकेत जाऊन माहिती घेऊ शकतो. परंतु फोनवर अशा प्रकारे कुठलीही माहिती बँक घेत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सायबरतज्ज्ञ अनिकेतकुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक