शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Satara: बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 12:04 IST

सहकार क्षेत्रात खळबळ

भुईंज : भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेने केली. याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतर काहीजणांवर पुणे येथील पोलिस आयुक्तालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरणासाठी बँक ऑफ इंडियाने ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. २०१० पासून कारखान्याचे आणि बँकेचे चांगले व्यावहारिक संबंध होते. त्यामुळे बँकेने एवढी मोठी रक्कम कर्ज स्वरूपात कारखान्याला मंजूर केली. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. यावेळी बँकेने १ कोटी ७० लाख ४३१ रुपये ३८ पैसे व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.

दरम्यान कारखान्याने डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कारखान्याच्या डिस्टिलरी उभारणीसाठी 'बँक ऑफ इंडिया' ला दिलेली मालमत्ता तारण देऊन बँकेची फसवणूक केली. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे खोटी आर्थिक विवरणपत्रे व कागदपत्रे सादर केली व बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला. हे कर्ज प्रकरण थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सीबीआय (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ मे २०२४ रोजी पुणे येथील पोलिस आयुक्तालयात हा गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त (नवी दिल्ली) मनीष नवलाखे हे अधिक तपास करत आहेत.

काय कारवाई केली याची माहिती मिळाली नाहीकर्ज घेतल्याची घटना २०१० ची असून त्या कर्जाचा योग्य तो विनियोग झालेला आहे. याबाबत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. याबाबत संबंधित खात्याने काय कारवाई केली आहे. कोणत्या कारणाने केली आहे. त्याची सविस्तर माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. संबंधित बँकेचे कर्ज कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या प्रयोजन कार्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले होते. त्यातील काही रक्कम भरावयाची राहिली असेल ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत कारवाई असावी. संपूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याबद्दल काही बोलू शकत नाही. सध्या दोन अडीच वर्षांपासून आमचे व्यवस्थापन किसनवीर कारखान्यावर नाही. - मदन भोसले, माजी अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी