रेकॉर्डब्रेक कर्जवाटप : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत शासनाने दिलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहाेचण्यासाठी बँकांचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. गतवर्षी देखील जिल्ह्यातील बँकांनी उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केले.
जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट झाले होते. गतवर्षीचा पाऊस देखील लांबल्याने शेतात उभे असलेले पीक नासून गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शासनाने महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना जाहीर केल्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला शेतकरी यानिमित्ताने कर्जमुक्त झाल्याने चिंतामुक्त देखील झालेला पहायला मिळतो.
शासन कर्जमुक्तीची घोषणा करीत असल्याने कर्ज वाटप करणाऱ्या बँकादेखील अडचणीतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अनेक कर्ज प्रकरणे येथून बाहेर पडतात. त्यामुळे बँकांना देखील दिलासा मिळतो.
पॉइंटर्स
असे झाले पीक कर्ज वाटप
(सर्व आकडे कोटींत)
२०१६-१७ - उद्दिष्ट २६८४, प्रत्यक्ष वाटप ३५३२, शेतकरी संख्या ३२६५९३
२०१७-१८ - उद्दिष्ट २७५० प्रत्यक्ष वाटप २३३८ शेतकरी संख्या ३१२९१३
२०१८-१९ - उद्दिष्ट २८०० प्रत्यक्ष वाटप ३५३२ शेतकरी संख्या ३५१४५६
२०१९-२० - उद्दिष्ट २९०० प्रत्यक्ष वाटप २१२८ शेतकरी संख्या २१२७७१
२०२०-२१ - उद्दिष्ट २२०० प्रत्यक्ष वाटप २२९३ शेतकरी संख्या ३२२४४७
कोट..
शेतकऱ्यांना मागणीनुसार पीक कर्ज मिळावे, यासाठी महाबँक लक्ष ठेवून असते. तसेच पीक कर्ज देणाऱ्या बँकांनादेखील त्याबाबतच्या सूचना केल्या जातात. जिल्ह्यातील पीक कर्ज देणाऱ्या बँकांनी देखील उद्दिष्टानुसार कर्जाचे वाटप केले आहे.
- युवराज पाटील, प्रबंधक अग्रणी बँक
कोट.
बँकेकडून पीक कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळे पीक खराब झाले. शासनाने वेळीच हातभार लावल्याने डोक्यावरचे कर्ज राहिले नाही.
- प्रताप बाबर, शेतकरी
कोट..
पीक कर्ज माफीकडे आमच्या कुटुंबाच्या नजरा लागल्या होत्या. जर ही कर्जमाफी झाली नसती तर मोठे अरिष्ट आमच्यावर कोसळले असते.
- सयाजी पवार, शेतकरी