मलटण : जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशावरून कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, गेली पंधरा दिवस फलटण शहर व साखरवाडी येथील बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. काही बँकांमध्ये कर्मचारीच कोरोनाबाधित झाल्यामुळे नागरिकही धास्तावले होते. यात फलटण शहरातील एका बँकेतील तब्बल नऊ कर्मचारी बाधित झाल्याने बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद केले होते. सध्या ‘बँका चालू; पण सर्व्हर बंद’ अशी अवस्था झाली आहे.
या पंधरा दिवसांच्या निर्बंधानंतर मंगळवारपासून बँकांचे कामकाज सुरू झाले असले, तरी बँकांचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपेना. फलटण शहर व ग्रामीण भागातील साखरवाडी, सुरवडी परिसरातील बँका सुरू झाल्या; परंतु सर्व्हर डाऊन असल्याने बँकांबाहेर प्रचंड गर्दी आणि आत कामकाज ठप्प, अशी अवस्था होती. साखरवाडी परिसरातील बँकेत सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला होता. आधीच पंधरा दिवस कामकाज बंद असल्याने बँकेत प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जात होते, बाहेर तासभर नागरिक उन्हात उभे होते. गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्स पाळला जाऊ शकत नव्हता. अनेक ग्राहक रांगेत उभे राहून थकल्याने घरी जाणे पसंत करत होते. काही व्यवहार महत्त्वाचे असल्याने त्या नागरिकांची घालमेल होताना दिसत होती. बँकांच्या बाहेर जेवढी घालमेल दिसत होती, तेवढे आतील कामकाज शांत व कासवगतीने सुरू होते. पंधरा दिवसांचे थांबलेले व्यवहार सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.
===Photopath===
190521\img_20210519_101543966.jpg
===Caption===
साखरवाडी ता फलटण येथील बँकासमोर प्रचंड रांगा लागल्या होत्या