कोळकी : दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. संदीप धनाजी भोसले असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निंबळक ता. फलटण येथील संदीप धनाजी भोसले हा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षा पासून फरार होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना तो गुंगारा देत होता. अखेर तो वाजेगांव येथे घरी येणार असल्याचे माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या पोलीस टीमसह सापळा रचला. दरम्यान संदीप भोसले यास पळून जायच्या तयारीत असतानाच सिनेस्टाईलने पाठलाग करुन शिताफीने पकडून अटक केली. पोलीस अंमलदार गणेश अवघडे, पोलीस कॉस्टेबल यादव यांनी ही कारवाई केली.या कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे व पोलीस जवानांचे अभिनंदन केले. याचा अधिक तपास बरड पोलीस दुरक्षेञाचे सहाय्यक निरिक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
सातारा : दोन वर्षापासून होता फरार, बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 3:03 PM