लखन नाळे - वाठार निंबाळकर -संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामस्थळावरील असुविधांमुळे माउलीभक्तांना अडचणींचा सामना करावा लागतो. माउलींची वारी सुखद व्हावी, यासाठी प्रशासनाने चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वारकरी, भाविकांमधून होत आहे. बरड, ता. फलटण येथे माउली पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. या कालावधीत वारकऱ्यांना प्रशासनाने चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वारकऱ्यांसाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्याची नेहमी टंचाई जाणवते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाच वर्षांपूर्वी नीरा कालव्यावरून पाणी उचलून शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. याप्रश्नी प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. टॉवर उभारून विजेचे दिवे बसविणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची उभारणी करावीपालखी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची गैरसोय होते. यासाठी पालखीतळावर फिरत्या शौचालयांची सोय केल्यास भाविकांची सोय होणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात स्नानगृह उभारणे गरजेचे आहे.पालखीतळाची जागा वाढवावीआळंदी-पंढरपूर या पालखी मार्गावरील बरड पालखी तळाची जागा अपुरी पडत आहे. तळाशेजारी असलेल्या वनविभागाच्या वीस एकर जागा पालखी तळासाठी दिल्यास चांगली सोय होणार आहे. तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने शासनाला पाठविला आहे.काटेरी झुडुपांची वाढपालखी तळावर व रस्त्याकडेला काटेरी झुडुपांची वाढ झाली आहे. त्यामुळे पायी दिंडीतील वारकऱ्यांना काट्याकुट्यांचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. वारीतील वाहने रस्त्यावर लावली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यासाठी वाहनतळ तयार करणे गरजेचे आहे.
पालखी मार्गात काटेरी झुडपांचा अडसर
By admin | Published: June 25, 2015 11:34 PM