कऱ्हाड : ‘कऱ्हाड दक्षिणसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. कोणी पुढलं तर कुणी मागलं बांधलंय; पण आधी मुख्यमंत्री उभे राहताहेत का बघू. ते नाहीच म्हटले तर इतरांचं काय ते बघू; पण आता विधानसभेच्या तयारीला लागा,’ असे मत सातारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते जयवंत जगताप यांनी व्यक्त केले. सवादे, ता. कऱ्हाड येथे औंड-उंडाळे परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.त्यावेळी ते बोलत होते. शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, नाना पाटील, वि. तु. सुकरे, अॅड. ए. वाय. पाटील, अॅड. अशोकराव थोरात आदींची प्रमुख उपस्थित होती.सुनील पाटील म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कोणा एकाची मक्तेदारी नाही. अन् कुणाला वाटत असेल तर मतदार ती मोडीत काढायला सज्ज झाले आहेत.’ प्रकाश पाटील म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींनी खरंतर विकासकामासाठी प्रतिनिधीत्व करायचे असते; पण कऱ्हाड दक्षिणमधील विद्यमान लोकप्रतिनिधी चांगल्या कामाला विरोध करण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे यंदा लोक त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवतील.’प्रा. ए. जी थोरात, अॅड. सरपंच शिवाजी थोरात यांचे स्वागत केले. संजय शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.उपसरपंच सचिन थोरात यांनी आभार मानले.कार्यक्रमास शिवाजीराव मोहिते, तानाजी चवरे, सचिन बागट, प्रवीण थोरात, धनाजी शेवाळे, रामचंद्र भावले, संजय शेटे, भास्कर शेवाळे, अर्जुन शेवाळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत थोरात, नितीन थोरात रंगराव सुतार, रघुनाथ पाटी, दिलीप कदम, प्रदीप थोरात आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
‘दक्षिण’साठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
By admin | Published: July 06, 2014 11:10 PM