शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

गुडघ्याला बाशिंग; पण आरक्षणाने निराशा !

By admin | Published: October 06, 2016 11:37 PM

कऱ्हाड पालिका नगराध्यक्ष पद : अनुसूचित जाती-जमाती महिलेला पाच वर्षांची ‘लॉटरी’; कोण उतरणार रिंगणात? शहरात चर्चेला उधाण

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड नगराध्यक्ष आरक्षणाचं घोडं बुधवारी अखेर मुंबईत न्हालं. कऱ्हाड पालिका नगराध्यक्ष पद पुढील पाच वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमाती महिलेसाठी राखीव झाले; पण गेले अनेक दिवस गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची त्यामुळे घोर निराशा झालीय. आरक्षण पडलेल्या प्रवर्गातून कोण-कोण महिला रिंगणात येऊ शकतात, याच्या चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.गेली २१ वर्षे खुल्या प्रवर्गाची हुलकावणी कऱ्हाडकरांना मिळत आली आहे. २००० मध्ये जयवंतराव पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर खुला प्रवर्ग आलाच नाही. यंदा मात्र खुला प्रवर्ग येईल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र, ती फोल ठरल्याने इच्छुकांची प्रतीक्षा आणखी वाढली, हे निश्चित. खरंतर मूळच्या आरक्षणानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी पद राखीव होते. मात्र, फेर आरक्षणात खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांच्या आशेवर पाणी फिरले आणि अडीच वर्षांसाठी संधी असणाऱ्या आरक्षणाची अनुसूचित महिलेला दुप्पट संधी मिळाली. फरक फक्त एवढाच झाला की आता त्यांना थेट जनतेमधून कौल आजमावा लागेल.अनुसूचित महिला प्रवर्गातून अनेक महिलांची नावे आता नगराध्यक्षपदाच्या चर्चेत येऊ लागली आहेत. त्यामध्ये लीना थोरवडे, शीतल वायदंडे आणि पूनम रसाळ या तीन विद्यमान नगरसेविकांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय माजी नगराध्यक्षा बाळूताई सूर्यवंशी, माजी नगरसेवक आनंदा लादे यांच्या पत्नी रूपाली लादे, सुजाता कांबळे यांच्यासह शांताराम थोरवडे, अशोक भोसले यांच्या कुटुंबातील महिलांची नावेही चर्चेत आहेत. मात्र सुशिक्षित आणि उच्चशिक्षित उमेदवार किती मिळणार, याचीही चर्चा सुरू आहे.दुधाची तहान ताकावरखरंतर अनुसूचित महिला राखीव नगराध्यक्ष आरक्षण पडल्याने निवडणुकीतील तणाव पन्नास टक्के कमी झाला आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आता दुधाची तहान ताकावर म्हणतात तसेच नगराध्यक्षपदाची तहान नगरसेवक पदावरच भागवावी लागणार आहे. उमेदवार शोधताना होणार कसरतअनुसूचित जमातीमधील नगरसेवकांसाठी चार जागांचे आरक्षण पडले आहे. तर नगराध्यक्षपदही अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पॅनेलला या ठिकाणी सक्षम उमेदवार शोधताना कसरत करावी लागणार, हे नक्की.कोण होणार नगराध्यक्ष ?नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले असले तरी निवडणुका पक्षीय की आघाडी पातळीवर होणार, याचे चित्र स्पष्ट नाही. आघाड्या किंवा पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्यास किती पक्ष किंवा आघाड्या रिंगणात उतरणार, हे स्पष्ट झाल्यावरच कोणाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती पाण्यात आहे, हे कळणार आहे.