शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वडूजच्या निवडणुकीत काटे की टक्कर...

By admin | Published: November 13, 2016 11:31 PM

१६ प्रभाग : वैयक्तिक गाठीभेटीवर उमेदवरांचा भर; दुरंगी, तिरंगीसह बहुरंगीही लढत

वडूज : वडूज नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी एक प्रभाग बिनविरोध झाला असून, उर्वरित १६ प्रभागांतील आरपारच्या निवडणुकीत एका प्रभागात दुरंगी, तीन प्रभागात तिरंगी तर अन्य प्रभागात बहुरंगी लढत रंगणार आहे. सध्या प्रचाराला पाहिजे तसा रंग आला नसला तरी वैयक्तिक गाठीभेटीवर उमेदवारांचा भर असल्याचे दिसून येत आहे. वडूजमधील प्रभाग एकमध्ये काँग्रेसचे अमर फडतरे, राष्ट्रवादीचे श्रीकांत काळे व अपक्ष शहाजीराजे गोडसे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रभाग दोनमध्ये काँग्रेसच्या मंगल काळे, राष्ट्रवादीच्या वंदना पवार, भाजपाच्या साधना काळे, ‘रासप’च्या शकुंतला काळे, अपक्ष चंपा काळे, नीलिमा काळे असे एकूण सहाजण निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादीच्या काजल वाघमारे, काँग्रेसच्या दीपाली बडेकर, भाजपाच्या रुक्मिणी खुडे, शिवसेनेच्या कविता तुपे यांच्यासह माजी सरपंच कांताबाई अशोक बैले, रेश्मा दोरके, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या पद्मिणी खुडे अशा तब्बल सात महिला निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग चारमध्ये काँग्रेसच्या सुमन कुंभार, राष्ट्रवादीच्या सुवर्णा चव्हाण, भाजपाच्या मिनाज मुल्ला यांच्यासह अपक्ष जयश्री कुंभार अशी चौरंगी लढत होत आहे. प्रभाग पाचमध्ये राष्ट्रवादीचे हणमंत खुडे, काँग्रेसचे प्रदीप खुडे, भाजपचे सागर रायबोळे, शिवसेनेचे नीलेश रायबोळे अशी चौरंगी लढत होत आहे. प्रभाग सहामध्ये काँग्रेसचे जैनुद्दीन ऊर्फमुन्ना मुल्ला, राष्ट्रवादीचे अशोक गाढवे, भाजपातर्फे माजी सरपंच अनिल माळी यांच्यासह महेश खडके, दाऊद मुल्ला, मुसा मुल्ला, विजयकुमार शेटे, विजयकुमार ऊर्फ बापू शेटे अशी बहुरंगी लढत होत आहे. प्रभाग सातमध्ये राष्ट्रवादीचे विजय काळे, काँग्रेसचे महेश गुरव यांच्यासह अपक्ष सचिन काळे अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग आठमध्ये शिवसेनेच्या रेखा जाधव, काँग्रेसच्या शुभांगी जाधव, राष्ट्रवादीच्या सुजाता रणजित जाधव, अपक्ष सुजाता अमित जाधव, कमल यादव, हेमलता यादव, सुमन शिंदे अशी बहुरंगी लढत होत आहे. प्रभाग दहामध्ये शिवसेनेचे संजय खुस्पे, काँग्रेसचे अमोल गोडसे, भाजपचे राजेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे अरविंद जाधव यांच्यासह अपक्ष विपुल गोडसे रिंगणात उतरल्याने या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. प्रभाग अकरामध्ये राष्ट्रवादीचे सुनील गोडसे, काँग्रेसचे सचिन ऊर्फ शंकर गोडसे-पाटील, भाजपचे अमर जाधव यांच्यासह अपक्ष वैभव शिंदे व अर्चना चव्हाण अशी पंचरंगी लढत होत आहे. प्रभाग बारामध्ये राष्ट्रवादीच्या सुनीता कुंभार, काँग्रेसच्या क्रांती काटकर, शिवसेनेच्या वासंती काळे व अपक्ष पल्लवी सजगणे यांच्यामध्ये चौरंगी लढत होत आहे. प्रभाग तेरामध्ये काँग्रेसच्या प्रतीक्षा भोसले, भाजपाच्या नीता घाडगे, राष्ट्रवादीच्या सुनीता खाडे यांच्यासह डॉ. नीता गोडसे, सुजाता इंगळे यांच्यामध्ये पंचरंगी लढत होत आहे. प्रभाग चौदामध्ये काँग्रेसचे अशोकराव गोडसे विरुद्ध भाजपाचे वचनशेठ शहा अशी दुरंगी लढत होत आहे. प्रभाग पंधरामध्ये राष्ट्रवादीच्या शोभा माळी, काँग्रेसच्या नंदा बनसोडे व शिवसेनेच्या रेखा बनसोडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. प्रभाग सोळामध्ये काँग्रेसच्या सुनीता गोडसे, राष्ट्रवादीच्या स्रेहल गोडसे, भाजपच्या किशोरी पाटील यांच्यासह रुपाली जमदाडे, नीलम गोडसे, लता पवार अशी बहुरंगी लढत होत आहे. प्रभाग सतरामध्ये राष्ट्रवादीचे प्रा. बंडा गोडसे, काँग्रेसचे दीपक गोडसे, भाजपाचे यशवंत ऊर्फ बाळासाहेब गोडसे यांच्यासह अपक्ष गोविंदराव शिंदे, संदीप गोडसे व विजय गोडसे अशी बहुरंगी लढत होत आहे. (प्रतिनिधी)