शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

लोकसभेच्या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:09 PM

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची ठरली. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने जोरदार तयारी केलेली या निवडणुकीत पाहायला मिळाले. १९९९ च्या पराभवानंतर युतीने हा मतदारसंघ लढला. मात्र, युतीने जितकी ताकद यंदा लावली, तेवढी ताकद यापूर्वी अपवादानेच लावली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला धक्का देण्याचे तंत्र भाजप-शिवसेनेने राबविले. युतीने अत्यंत विचार करून याठिकाणी उमेदवार दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिवाकर रावते आदींच्या मोठ्या सभा सातारा मतदार संघात घेण्यात आल्या.लोकसभेची ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वच आमदार व विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाºया उमेदवारांसाठी रंगीत तालीमच ठरली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कºहाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी खासदार उदयनराजेंसाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पक्षाची जबाबदारी म्हणून नरेंद्र पाटील यांचे काम केले. तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचे संभावित उमेदवार समजले जाणारे महेश शिंदे (कोरेगाव), पुरुषोत्तम जाधव, मदन भोसले (वाई), मनोज घोरपडे (कºहाड उत्तर), अतुल भोसले (कºहाड दक्षिण), दीपक पवार (सातारा-जावळी) यांनी नरेंद्र पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी धावाधाव केली. पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे संभावित उमेदवार सत्यजित पाटणकर यांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने आपली ताकद लावली.सर्वच उमेदवारांनी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युती अथवा आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी या उमेदवारांनी प्रयत्न केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरच या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.काही मतदार संघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. साहजिकच विधानसभा मतदार संघातील मतांच्या आकडेवारीला महत्त्व आहे. याचा अभ्यास करूनच विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याने संभावित विधानसभा उमेदवारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे.मुख्य लढत राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यातच होणार आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही निकराची लढत दिली असल्याने ही आघाडी अधिक मते घेण्याची शक्यता आहे. आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या मतदारांनी घेतलेले मतदान नेमके कुणाला फायद्याचे आणि कुणाच्या तोट्याचे, हे २३ मेनंतरच स्पष्ट होणार आहे.ऐनवेळीच घडलं-बिघडलंखासदार उदयनराजेंच्या उमेदवारीला सुरुवातीला पक्षांतर्गत विरोध झाला होता. बारामती, पुणे, मुंबईत अनेक बैठका झाल्या. शेवटी उदयनराजेंच्याच नावावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून सर्व आमदारांनी एकजुटीने उदयनराजेंचे काम केले. दरम्यान, युतीतही अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला या मतदार संघातून दोनवेळा लढलेले पुरुषोत्तम जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पुन्हा एकदा शिवबंधन धागा बांधला गेला होता. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार, असे वातावरण असतानाच अचानकपणे भाजपचे नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी घडतंय-बिघडतंय, असे चित्र सातारा लोकसभा मतदार संघात पाहायला मिळाले.वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा?गत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला होता. वाढलेला टक्का उदयनराजे भोसले यांच्यासाठी फायद्याचा ठरला होता, यंदाही चार टक्क्यांनी मतदान वाढले आहे, हे वाढलेले मतदान कुणासाठी पोषक ठरणार? याबाबत मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे. वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ९९ हजार २५२ इतके मतदान झाले. त्या खालोखाल सातारा-जावळी मतदार संघातून १ लाख ९८ हजार १५५ मतदान झाले. कºहाड दक्षिण व कºहाड उत्तर या दोन मतदार संघातूनही मतदानाचा टक्का वाढला.