शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

पब्लिकच्या संतापावरही बीडीओ शांतच-- स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत टीम’चा अनोखा प्रयोग : अकरा तालुक्यांच्या अकराही अधिकाऱ्यांकडून मोबाईलवर बोलताना अत्यंत सावध प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:59 PM

लोकमत टीमसातारा : माणचे पंचायत समिती सभापतींनी गटविकास अधिकारी उद्धटपणे बोलतात. ‘मी तुमचा घरगडी नाय,’ असं म्हणतात, असा आरोप भरसभेत केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’नं जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचं शनिवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ केलं. सुटीचा दिवस असूनही काही नागरिकांनी गटविकास अधिकाºयांच्या मोबाईलवर फोन करून आपल्या अडचणी सांगितल्या. यापैकी बहुतांश ...

लोकमत टीमसातारा : माणचे पंचायत समिती सभापतींनी गटविकास अधिकारी उद्धटपणे बोलतात. ‘मी तुमचा घरगडी नाय,’ असं म्हणतात, असा आरोप भरसभेत केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’नं जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचं शनिवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ केलं. सुटीचा दिवस असूनही काही नागरिकांनी गटविकास अधिकाºयांच्या मोबाईलवर फोन करून आपल्या अडचणी सांगितल्या. यापैकी बहुतांश अधिकाºयांनी अत्यंत सावधपणे बोलत ‘कार्यालयात प्रत्यक्ष भेटायला या,’ असा सल्ला दिला. तसेच यापैकी काही गटविकास अधिकाºयांनी अडचणींवर मात करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले.तुम्ही सोमवारी मला फोन करा.... मी वडूजमध्ये टँकरचं बघून घेतो !खटाव : खटाव तालक्याचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून रमेश काळे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांना मायणीतील पाणी टँकर बंद झाला असून, तो सुरू करण्याबद्दल सांगितले. यावर ते म्हणाले, ‘मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. साहित्य नेण्यासाठी बुलढाण्याला आलो आहे. सोमवारी मला फोन करा. मी वडूजमध्ये बघून घेतो. अडचण नसेल तर टँकर सुरू करू.तसेच तलाठ्याकडून याबाबत माहिती घेण्यात येईल.’बरं.. बरं.. मी किनई लगेच अण्णासाहेबांशी बोलते !सातारा : सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमिता गावडे यांना शनिवारी दुपारपासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. काही कारणांमुळे त्यांनी फोन उचलले नाहीत; मात्र रात्री साडेसात वाजता त्यांच्याशी संपर्क झाला. कचºयाच्या समस्येविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘बरं.. बरं मी अण्णासाहेबांशी बोलते,’ असे सांगितले.शहरातील उपगनरांमध्ये असलेली घाण, घाणीची दुर्गंधी आणि त्यामुळे सामान्यांना होणारा त्रास याविषयी त्यांच्याशी बोलण्यात आले. कचºयाच्या वासाने आम्हाला कर्करोग होईल, असे म्हटल्यावर त्यांनी, ‘काळजी करू नका, तुम्हीकुठं राहता ते सांगा, मी अण्णासाहेबांशी बोलून घेते,’ असे त्या म्हणाल्या.सुमारे १ मिनीट ४ सेकंद झालेल्या या संभाषणात त्यांनी कचºयाची समस्या सांगणाºयाला त्याचे नाव आणि राहण्याचा पत्ता विचारला. ‘काळजी करू नका,’ असा धिराचा सल्ला देत त्यांनी समोर आलेल्या समस्येविषयी योग्य त्या यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरा का फोन केला म्हणून ना त्या चिडल्या ना त्यांनी उद्धट उत्तर दिले.आम्ही काम केलंय, तुम्ही खंडाळ्यात भेटाखंडाळा : ‘घाडगेवाडी प्राथमिक शाळेत शिक्षक देण्याबाबत जिल्हा परिषदेला कळविले आहे. तुम्ही सोमवारी कार्यालयात या मग चर्चा करू,’ असे उत्तर खंडाळा गटविकास अधिकाºयांनी दिले.घाडगेवाडी येथे शाळा सुरू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कायम शिक्षक नाही. त्यामुळे घाडगेवाडीचे ग्रामस्थ हिरालाल घाडगे यांनी फोन करून गटविकास अधिकारी दीपा बापट यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘तुमच्या मागणीप्रमाणे जिल्हा परिषदेला शिक्षक देण्याबाबत आम्ही कळविले आहे. शिक्षकांची नेमणूक करणे हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते. आम्ही कळवायचे काम केले आहे. तुम्ही सोमवारी कार्यालयात भेटा. मग आपण चर्चा करू,’ असे त्यांनी स्पष्ट केले.कोरेगावात डॉक्टर उपलब्ध करून देण्याची ग्वाहीकोरेगाव : ‘सायेब.. पळशीच्या सरकारी दवाखान्यात संध्याकाळी डॉक्टर नसत्यात, पावसाळ्यात थंडी-ताप आला तरी सकाळपातुर थांबाय लागतंया... तुम्ही काय बी करा आन् डॉक्टरला संध्याकाळी थांबवा,’ अशी मागणी करणाºया पळशीतील सामान्य शेतकºयाने मोबाईलवरून गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याकडे केली.महिन्याचा दुसरा शनिवार हा शासकीय सुटी असताना देखील मगर यांनी मोबाईलवरील कॉल घेत प्रथम ‘नमस्कार’ हे शब्द उच्चारले. शेतकºयाने पळशी रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर देण्याची मागणी केली. त्यावर शेतकºयाने पुन्हा सर्व माहिती सांगितल्यावर मगर यांनी ‘मी सध्या सुटी असल्याने परराज्यात आलो आहे. सोमवारी सकाळीच मी पंचायत समितीत माझ्या कार्यालयात उपलब्ध असणार आहे.

तिथे तुम्ही या आणिनेमकी अडचण काय आहे, ते सांगा. मी तालुका आरोग्य अधिकाºयांनाबोलावून घेऊन, पळशीतकायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याविषयीआदेश देईन,’ असे एका दमातच सांगितले.जावळीत एक रुपयाही कोणाला देऊ नका...जावळीचे प्रभारी गटविकास अधिकारी संताजी पाटील यांना ‘घरकुल मंजूर करून कोणी देत नसून, काहीजण पैसे मागतायत?,’ असे सांगण्यात आले. यावेळी पाटील यांनी ‘तुम्ही कोण, कुठून बोलत आहात,’ याची चौकशी केली. ‘केळघरमधून बोलतोय,’ असे त्यांना सांगण्यात आले. पाटील म्हणाले, ‘तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन तुमचे ‘ड’ यादीत नाव आहे का ते पाहा,’ असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर ‘तुम्ही कुणालाही एक रुपयाही देऊ नका,’ असे ठणकावून त्यांनी शेवटी सांगितले... वाईच्या कार्यालयात भेटा समस्येचं निराकारण करु...पाचवड : तुम्हीमला कार्यालयात भेटा तुमच्या समस्येचे निराकरण करण्यातयेईल, असे उत्तर वाईचे गटविकास अधिकाºयांनी दिले.बीडीओ साहेब, तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने आमच्यासारख्या शेतकºयांना सरकारी पशुधन पर्यवेक्षक योग्यवेळी उपलब्ध होत नाही. आमच्या दुभत्या जनावरांच्या उपचारासाठी खासगी जनावरांच्या डॉक्टरांना बोलवावे लागते? असा प्रश्न तीन-चार महिन्यांपूर्वी वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या उदयकुमार कुसूरकर यांना विचारला असता अतिशय विनम्रपणे त्यांनी सांगितले की, ‘मी हैद्राबाद येथे शासकीय कार्यशाळेसाठी आलो आहे.

तुमची समस्या रास्त असून, तुम्ही मला कार्यालयात भेटा तुमच्या समस्येचे निराकरण करण्यातयेईल, असे उत्तर यावेळी समोरून मिळाले. वाई पंचायत समितीचे यापूर्वीचे बीडीओ अशोक भंवारी यांच्या कार्यपध्दतीवर कर्मचारी व पदाधिकाºयांकडून जोरदार टीका झाली होती. त्यावेळच्या घडामोंडींचा समारोप शेवटी अशोक भंवारीयांच्या बदलीने झाला. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात रुजू झालेले उदयकुमार कुसूरकर मानसिक त्रासालासामोरे गेलेल्या पदाधिकारी व कर्मचाºयांशी कशाप्रकारे समन्वय साधतात याकडे सर्वांचे लक्ष होते.पाटणमध्ये म्हणे मीच तुमच्याकडं येतो !पाटण : ‘पाटणच्या दुर्गम भागातील गावात ग्रामसेवक फिरकत नाहीत. तुमच्या आॅफिसला दोन वेळा आलो तुम्ही भेटत नाही, तुम्ही आमच्याकडे भेट दिलेली नाही,’असे प्रश्न विचारल्यानंतर पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी ‘सोमवारी बघू आणि मी पुढील आठवड्यात तिकडे येईन,’ अशी उत्तरे देऊन वेळ मारूननेली.मी पांडुरंग कदम बोलतोय, ‘पाटण तालुक्यात मोरणा भागात आटोली हे गाव दुर्गम भागात आहे. तिथे ग्रामसेवक येत नाहीत. तुम्ही कधी भेट देणार? असे प्रश्न विचारल्यावर गटविकास अधिकारी संजीव गायकवाड म्हणाले की, ‘सोमवारी बघतो आणि मी पुढील आठवड्यात तिकडे येतो. आज तुम्हाला सुटी आहे काय? , असे विचारल्यानंतर ‘दोन दिवस सुटी आहे,’ असे सांगून गटविकास अधिकारी गायकवाड यांनी घाई करत कॉल पूर्ण केला.फलटण बीडीओंनी दिली सावध उत्तरेफलटण : फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा सध्या कार्यभार सहायक गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याकडे आहे. शनवारी दुपारी त्यांना एका ग्रामस्थामार्फत अनेक समस्या फोनद्वारे सांगण्यात आल्या, याबाबत त्यांनी प्रवासात असूनही समाधानकारक उत्तरे दिली.‘पाणी, घरकूल, रस्त्याबाबत आलेल्या तक्रारींवर त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीत तक्रार करा किंवा सोमवारी पंचायत समितीमध्ये या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करू. फोनवरून तक्रारी सोडविता येणार नाही, प्रत्यक्ष आल्यावर चर्चा करू,’ असे त्यांनी स्पष्ट केले.कºहाडमध्ये अधिकारी म्हणे,‘हो.. करतो की कारवाई !’कºहाड : कºहाड तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असल्याचे लक्षात येताच. काही युवकांनी येथील गटविकास अधिकाºयांना फोन केला व कारवाई करताय की नाही? असे विचारणा केली असता गटविकास अधिकारी पवार म्हणाले, ‘हो करतो की कारवाई. मात्र,कारवाईची जबाबदारी ही तहसीलदार अन् ग्रामसेवकांचीही आहे की,’असे उत्तरही या अधिकाºयांनी यावेळी दिले.महाबळेश्वरमध्ये अधिकारी देण्यात येईलमहाबळेश्वर : सहायक गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे यांना वानवली तर्फ सोळशी येथे ग्रामसेवक देण्याची मागणी केली. त्यांनी सोमवारी कसल्याही परिस्थितीत अधिकारी येईल, असे सांगितले.माणचे शेलार म्हणतात, ‘टँकर सुरु होईल’म्हसवड : शनिवारी दुपारी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. डी. शेलार यांना ग्रामस्थ नरळे बोलतोय म्हणून मोबाईलवरुन संपर्क साधला. गटविकासअधिकारी शेलार यांना पानवण गावामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल सांगताच ते म्हणाले