शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

गटासाठी होणार गर्दी; गणांसाठी शोधाशोध !

By admin | Published: October 18, 2016 12:47 AM

हिंगणगाव : फलटण तालुक्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट खुला झाला असून, गणही खुल्या वर्गातील महिलेसाठी तर सुरवडी गण ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत गटातील निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी असणार आहे तर गणांसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. हिंगणगाव गट काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीपूर्वी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातील पाण्याचे पूजन झाले आणि चित्र पालटले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सारिका अनपट यांनी काँग्रेसच्या विमलताई साळुंखे-पाटील यांचा पराभव केला. त्यानंतरच्या कालावधीत राजकीय क्षेत्रात अनेक बदल झाले. सध्या तर आरक्षणात हिंगणगाव गट खुला झाला असून, गण महिलेसाठी तर दुसरा सुरवडी गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. गतवेळी दिवंगत आमदार चिमरणराव कदम यांचे समर्थक दत्ता ऊर्फ धैर्यशील अनपट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्यासमोर उभे राहण्यास कोणी तयार नव्हते. दत्ता अनपट यांनी पत्नी सारिका यांच्यासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी पत्नी विमलताई यांच्यासाठी निवडणूक लढविली. मात्र, धोम-बलकवडीचे पाणी आणि काँग्रेसमधीलच गटबाजीमुळे साळुंखे-पाटील यांना पराभव पत्करावा लागला. असे असलेतरी सुरवडी गणातून मात्र काँग्रेसचेच धनंजय साळुंखे-पाटील हे निवडून आले. गेल्यावेळच्या निवडणुकीनंतर राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी हिंगणगाव गटावर लक्ष केंद्रित केले. अनपट यांच्या माध्यमातून गट आणि गणात विकासकामे करण्यात आली. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी गट खुला झाला आहे. हिंंगणगाव गण महिलेसाठी राखीव आहे. गणासाठी पंचायत समितीच्या सदस्या स्वाती भोईटे यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादीकडून पुन्हा होऊ शकतो. तसेच दीपाली प्रवीण भोईटे यांच्याही नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून सीमा भोईटे दावेदार आहेत. तर सुरवडी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या गणातून प्रियांका सरक, विद्या देवकर, मंजुषा भोसले यांची नावे सध्यातरी चर्चेत आहेत. हिंगणगाव गट खुला झाल्याने दत्ता अनपट, विलासराव झणझणे, म्हस्कू अनपट, शरदराव भोईटे, अनिल भोईटे, विश्वासराव निंबाळकर सुभाषराव धुमाळ, विलासराव नलवडे, शंकरराव नलवडे, नवनाथ बोबडे, चंद्रकांत बोबडे, पंकज शिंदे यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत येत आहेत. काँग्रेसकडून प्रल्हादराव साळुंखे-पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय पाटील, राजेंद्र काकडे, दादासाहेब नलवडे, सुरेश भोईटे यांची नावे पुढे आली आहेत. भाजपकडून विशाल झणझणे, संजय निंबाळकर, सुरेश निंबाळकर इच्छुक आहेत. शिवसेनेकडून हणमंत बासर तर रासपकडून खंडेराव सरक दावेदार समजले जातात. कदम गटाला नेतृत्व... काही दिवसांपूर्वीच दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम यांचा मुलगा सह्याद्री कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कदम गटाला आता नेतृत्व मिळाले आहे. परिणामी कदम गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना, भाजप, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, महाआघाडी अशी तिरंगी लढत गटात होऊ शकते.