निखिल किशोर पाटील, किशोर अरुण पाटील, प्रदीप दिलीप पाटील (तिघेही रा.उंडाळे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंडाळे येथील सुहास पाटील व त्यांचे चुलतभाऊ किशोर अरुण पाटील यांच्यात शेतीच्या हद्दीवरून वाद आहे. रविवारी सुहास पाटील हे त्यांच्या त्रिमूर्ती हॉटेलमध्ये असताना किशोर पाटील व निखिल पाटील तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत, सुहास पाटील यांना मारहाण करायला सुरुवात केली. निखिल पाटील याने सुहास पाटील यांना कुऱ्हाडीने मारहाण केली, तर प्रदीप पाटील व किशोर पाटील यांनी दांडक्याने मारहाण केली. हा प्रकार पाहून सागर निवास पाटील व निवास लक्ष्मण पाटील हे त्या ठिकाणी गेले असता, त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याबाबत उज्ज्वला सुहास पाटील यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. हवालदार खराडे तपास करीत आहेत.
जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:23 AM