सातारा : सातारा शहराजवळील देगाव रस्ता येथे किरकोळ कारणातून एका चालकाला दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विकास रवींद्र गोगावले (वय २७, रा. पांढरवाडी, कोडाली, ता. सातारा) याने तक्रार दिली आहे. विकास हा चालक आहे. ही मारहाणीची घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. किरकोळ वादाचा राग मनात धरुन तक्रारदाराला लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये तक्रारदाराच्या डोक्यात उजव्या बाजूला तसेच तोंडावर जखम झाली आहे. या तक्रारीनंतर जावेद पठाण (पूर्ण नाव नाही. रा. अमरलक्ष्मी एमआयडीसी, सातारा) याच्यासह अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
.......................................................